अकोला: लिफ्टमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 ऑक्टोबर 2017

खदान पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धाबेकर नगरातील अग्रवाल अपार्टमेंटमध्ये राहणारी अल्पवयीन मुलगी खेळणे झाल्यानंतर मोठ्या बहिणीसोबत लिफ्टने घरात जात होती. त्याचवेळी त्यांच्यासोबत पद्‌माकर इंगळे हाही त्यांच्यासाेबत लिफ्टमध्ये शिरला. त्याने त्या मुलीला जवळ घेऊन तिचा विनयभंग केला.

अकोला : लिफ्टमधून मोठ्या बहिणीसोबत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचा ५० वर्षीय व्यक्तीने विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. खदान पोलिसांनी यामध्ये विनयभंग आणि पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. 

खदान पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या धाबेकर नगरातील अग्रवाल अपार्टमेंटमध्ये राहणारी अल्पवयीन मुलगी खेळणे झाल्यानंतर मोठ्या बहिणीसोबत लिफ्टने घरात जात होती. त्याचवेळी त्यांच्यासोबत पद्‌माकर इंगळे हाही त्यांच्यासाेबत लिफ्टमध्ये शिरला. त्याने त्या मुलीला जवळ घेऊन तिचा विनयभंग केला. हा प्रकार मोठ्या मुलीने आईवडीलांना सांगितला. त्यांनी खदान पोलिस स्टेशनला पद्‌माकर इंगळेविरोधात विनयभंग आणि पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला. पद्‌माकर इंगळेला पोलिसांनी अटक केलेली नाही.   

Web Title: Akola news girl harassment in lift