तोडगा निघत नसल्याने आंदोलन चिघळणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

अकोला - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून सुरू झालेले यशवंत सिन्हा व सहकाऱ्यांचे अांदोलन दुसऱ्या दिवशी मंगळवारी कायम होते. अांदोलनाचा काळ जसजसा वाढतो अाहे, तसतशी विविध राजकीय पक्षांकडून अांदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चढाअोढही सुरू झाली अाहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर दुपारी जिल्हाधिकारी व जागर मंचाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कुठल्याही निर्णयाशिवाय संपली. तोडगा निघत नसल्याने अांदोलन चिघळण्याची शक्यता वाढली अाहे.

अकोला - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारपासून सुरू झालेले यशवंत सिन्हा व सहकाऱ्यांचे अांदोलन दुसऱ्या दिवशी मंगळवारी कायम होते. अांदोलनाचा काळ जसजसा वाढतो अाहे, तसतशी विविध राजकीय पक्षांकडून अांदोलनाला पाठिंबा देण्यासाठी चढाअोढही सुरू झाली अाहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर दुपारी जिल्हाधिकारी व जागर मंचाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक कुठल्याही निर्णयाशिवाय संपली. तोडगा निघत नसल्याने अांदोलन चिघळण्याची शक्यता वाढली अाहे.

विविध मागण्यांसाठी सोमवारी माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह जागर मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच ठिय्या देणाऱ्यांना सायंकाळी पोलिसांनी मुख्यालयात स्थानबद्ध केले. रात्री हे अांदोलन मागे घेण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न झाले. मात्र तोडगा न निघाल्याने यशवंत सिन्हा, रविकांत तुपकर, प्रशांत गावंडे, मनोज तायडे यांच्यासह शेकडोंनी पोलिस मुख्यालयातच मुक्काम केला. मंगळवारी सकाळी या अांदोलनाला पुन्हा उर्जिवस्था मिळाली. या कार्यकर्त्यांशी बोलताना यशवंत सिन्हा यांनी अापल्या प्रत्येक मागणीवर तोडगा मिळेपर्यंत अाता हे मैदान सोडणार नाही. कितीही दिवस अांदोलन करावे लागले तरी मागे जाणार नसल्याचे सांगत त्यांनी अांदोलकांमध्ये चैतन्य निर्माण केले. रविकांत तुपकर यांनीही अांदोलनाचा शेवट हा शेतकऱ्यांच्या मागण्या सुटतील तेव्हाच होईल, असे जाहीर केले. 

दुपारी खासदार नाना पटोले हेसुद्धा आंदोलनात सहभागी झाले. त्यांनी यावेळी बोलताना केंद्र व राज्यातील सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांवर कडाडून हल्ला केला. पक्षभेद विसरून सर्व एकत्र अाले तरच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो, असे सांगत त्यांनी सर्वांना या ठिकाणी सहभागी होण्याचे अावाहन केले. शेतकऱ्यांच्या मागण्या या रास्त असून कुठल्याही सरकारला सोडविणे सहज शक्य अाहे. 

सध्याचे सरकार हे शेतकऱ्यांसाठी काम करीत नसल्याचे सांगत त्यांनी हल्लाबोल केला. पीक विमा योजनेने शेतकऱ्यांना केवळ लुटले. मी या विषयावर पंतप्रधानांसमोर बोललो तर माझा विरोध करण्यात अाला, असे सांगत पटोले यांनी सध्याचे हे सरकार ‘गरिबां’चे म्हणजे गौतम अदानी, रिलायन्स, बाबा (रामदेव) यांच्यासाठी काम करते, असेही सांगितले. अापणही मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याचे पटोले यांनी सांगितले. या अांदोलनात लवकरच अामदार बच्चू कडू सहभागी होणार अाहेत. 

प्रशासनाची पळापळ
अांदोलनाचा कालावधी वाढत चालल्याने प्रशासनाची गोची झाली अाहे. जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय, त्यांचे सहकारी हे सातत्याने अांदोलकांशी चर्चा करीत अाहेत. मात्र मागण्यांवर तोडगा द्या, तरच अांदोलन मागे घेऊ, असे अांदोलकांकडून सांगितले जात अाहे. तर प्रशासन हे अापल्या स्तरावरील मागण्या तातडीने सोडविल्या जातील. राज्य व केंद्र स्तरावरील मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे सांगत अाहे. त्यामुळे कुठलाही तोडगा सायंकाळपर्यंत निघाला नव्हता. प्रशासनावरील ताण वाढत चालला अाहे.

Web Title: akola news nagpur yashwant sinha farmer