भाेंदुबाबांचा भंडाफोड करण्यासाठी संभाजी ब्रिगेड घेणार पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

मांडाेली येथे अनेक वर्षांपासून माणिक महाराज उर्फ माणिक कसनदास जाधव हा देवीच्या मंदिरात अमावस्या व पाैर्णिमेला दरबार भरवित हाेता. ताे अंगात स्वत:च्या अंगात देवीची स्वारी अाणून भक्तांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन त्यांना लुबाडत हाेता.

अकोला : संपूर्ण राज्यभर भाेंदुबाबा, ज्याेतिष्य, तथाकथित वास्तु शास्त्रांवर गुन्हे दाखल हाेण्यासाठी संभाजी ब्रिगेड पुढाकार घेणार असल्याची माहिती प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ. गजानन पारधी व जिल्हाध्यक्ष तथा अकाेला विभागीय अध्यक्ष पंकज जायले यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

बार्शीटाकळी न्यायालयाने ३ नाेव्हेंबर राेजी महाराष्ट्र नरबळी अाणि इतर अमानुष, अनिष्ट व अघाेरी प्रथा व जादुटाेणा प्रतिबंध अधिनियमान्वये भाेंदु बाबाला सुनावलेली तीन वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेचा निकाल हा राज्यातील पहिलाच एेतिहासिक असल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला.

मांडाेली येथे अनेक वर्षांपासून माणिक महाराज उर्फ माणिक कसनदास जाधव हा देवीच्या मंदिरात अमावस्या व पाैर्णिमेला दरबार भरवित हाेता. ताे अंगात स्वत:च्या अंगात देवीची स्वारी अाणून भक्तांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेऊन त्यांना लुबाडत हाेता. याप्रकरणी माणिक महाराजाविरोधात महाराष्ट्र नरबळी अाणि इतर अमानुष, अनिष्ट व अघाेरी प्रथा व जादुटाेणा प्रतिबंध अधिनियमन व भादंविचे कलम ४२० अन्वये बार्शीटाकळी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला. याप्रकरणी पाेलिसांनी तपास करून दाेषाराेपपत्र न्यायालयात सादर केले. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, गजानन चाेपडे, कुलदिप तराळे, प्रदीप काळपांडे यांनी साक्षी नाेंदवल्या हाेत्या. अखेर न्यायालयाने माणिक महाराजला कारावासाची शिक्षा ठाेठावली हाेती. संभाजी ब्रिगेडने मराठा सेवा संघाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन या निकालाबाबत माहिती दिली. भाेंदु बाबा, महाराजांबाबत जनतेने माहिती द्यावी, असे अावाहन संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात अाले. पत्रकार परिषदेला नितीन सपकाळ, अमित ठाकरे, गजानन चाेपडे, अविनाश नाकट, प्रदीप काळपांडे अादी उपस्थित हाेते.

Web Title: Akola news Sambhaji Brigade initiative