esakal | या अभिनेत्री विरूध्द अकोला पोलिसात तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

Akola police complain against this actress

मराठी सिने अभिनेत्री केतकी चितळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून रविवारी (ता.1) नवबौध्द  समाजावर आक्षेपार्ह विधान केले होते. या लिखाणावर काही जातीयवादी गिधाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत वकतव्य केले होते. या घटनेची माहिती कळताच अकोला जिल्हा काँग्रेस कमीटी अनुसूचित जाती विभागाचे पूर्व विधानसभा अध्यक्ष अंकुश गावंडे यांनी मंगळवारी (ता.3) खदान पोलिस ठाण्यात अभिनेत्री केतकी चितळे व अन्य दोन आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

या अभिनेत्री विरूध्द अकोला पोलिसात तक्रार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : मराठी सिने अभिनेत्री केतकी चितळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून रविवारी (ता.1) नवबौध्द  समाजावर आक्षेपार्ह विधान केले होते. या लिखाणावर काही जातीयवादी गिधाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर अतिशय खालच्या भाषेत वकतव्य केले होते. या घटनेची माहिती कळताच अकोला जिल्हा काँग्रेस कमीटी अनुसूचित जाती विभागाचे पूर्व विधानसभा अध्यक्ष अंकुश गावंडे यांनी मंगळवारी (ता.3) खदान पोलिस ठाण्यात अभिनेत्री केतकी चितळे व अन्य दोन आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.


देण्यात आलेल्या निवेदनात नमुद आहे की, 1 मार्च रोजी जातीयवादी व धार्मिक तेड निर्माण करणारी तसेच सार्वजनिक शांततेचा भंग करणारी पोस्ट लिहलेली आढळली. त्यामध्ये विविध मुद्दे नमूद आहेत. त्यापैकी क्रमांक सहाचा नवबौद्ध 6 डिसेंबरला फुकट मुंबईला दर्शनास येतात. तो धर्म विकासासाठीचा हक्क असा आहे. सदर फेसबुक पोस्टवर गैरअनुसूचीत जाती, जमातीचा सदस्य सूरज शिंदे या व्यक्तीने यांनेही भावना दुखविणारा मजकूर लिहला आहे. तेव्हा अभिनेत्री केतकी चितळे, सूरज शिंदे आणि मनोज तायडे या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

loading image