Vidarbha Rain News : शेगावात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, अकोल्यातील अमित शाहांच्या सभेवरही पावसाचे सावट

शेगाव शहर व परिसरात हनुमान जयंतीच्या दिवशी दुपारी 2 वाजता अचानक ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही वेळातच सोसाट्याच्या वादळ वाऱ्यासह पाऊस पडायला लागला.
Akola Shegaon Unseasonal rain Amit Shaha Sabha Latest Rain Update Marathi News
Akola Shegaon Unseasonal rain Amit Shaha Sabha Latest Rain Update Marathi News

शेगाव : विदर्भातील अनेक भागात आज पावसाने हजेरी लावली. यावेळी शेगाव शहर व परिसरात हनुमान जयंतीच्या दिवशी दुपारी 2 वाजता अचानक ढगाळ वातावरण तयार झालं आणि काही वेळातच सोसाट्याच्या वादळ वाऱ्यासह विजांचा लखलखाट आणि ढगांचा गड गडाट होऊन पाऊस पडायला लागला. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे आलेल्या पावसात काही ठिकाणी बोराएवढ्या तर काही ठिकाणी हरभऱ्याच्या दाण्या इतका गारांचा पाऊस पडला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. तर काही भागात शेती पिकांचे नुकसान ही झाले आहे.

यादरम्यान परिसरात काहींच्या घरावरील टीन पत्रे उडून गेल्याचे देखील पाहायला मिळाले. यामध्ये शेतकऱ्यांसमवेत ग्रामस्थांचे सुद्धा नुकसान झाले. विद्युत तारा तुटल्याने काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता.अचानक आलेल्या वादळी पावसाने दाणादाण उडवून दिली.

Akola Shegaon Unseasonal rain Amit Shaha Sabha Latest Rain Update Marathi News
Bachchu Kadu: अमरावतीचे मैदान कोण मारणार? अमित शहांच्या सभेपूर्वी बच्चू कडू पोलिसांमध्ये बाचाबाची

वारा अन् पावसाचा अमित शाहांच्या सभेला फटका

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवेगळ्या नेत्यांच्या जाहीर प्रचार सभांचे आयोजन केले जात आहे. आज अकोल्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या दुपारी तीन वाजता नियोजित सभेपूर्वी अकोल्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. यावेळी मंडपाचे कापड उडून गेल्याचे पाहायला मिळले. पावसामुळं अमित शाहांची सभा थोड्या उशीराने सुरु होणार असल्याची माहिती देण्यात आली.

Akola Shegaon Unseasonal rain Amit Shaha Sabha Latest Rain Update Marathi News
PM Modi Portrait : तरुणीने काढलं पंतप्रधानांचं स्केच; भाषण सुरू असताना मोदींनी पाहिलं अन् लगेच घेतलं मागवून.. व्हिडिओ समोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com