SkyNex Aero Flying Training School is set to begin operations in Akola, offering pilot training opportunities to aspiring candidates from Vidarbha.
esakal
अकोला : वैमानिक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अकोला आणि विदर्भातील युवकांसाठी आता मोठी संधी उपलब्ध होणार आहे. पायलट प्रशिक्षणासाठी चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू यांसारख्या शहरांकडे धाव घेण्याची गरज आता कमी होणार असून, अकोल्यातच ‘स्कायनेक्स एरो फ्लाईंग ट्रेनिंग स्कूल’ सुरू होण्याच्या मार्गावर आहे. खासदार अनुप धोत्रे यांच्या विशेष प्रयत्नांतून अकोल्यात दाखल झालेले हे प्रशिक्षण केंद्र येत्या आठवडाभरात आवश्यक तयारी पूर्ण करून कार्यान्वित होणार आहे.