यांनाही बसला लॉकडाउनचा फटका; शीतपेय विक्रेते आर्थिक संकटात

कृष्णा फंदाट
Sunday, 3 May 2020

कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून केंद्र शासनाने लॉकडाउन जाहीर केला आहे. यामुळे सर्व छोटे-मोठे व्यवसाय ठप्प पडले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शीतपेयांची विक्री करणारे तसेच उसाचा रस विकणारे छोटे व्यावसायिकांना लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे. उन्हाळ्याच्या हंगामाचे त्यांच्याकडून चार ते पाच महिन्यांपूर्वी नियोजन केले जाते. त्यामध्ये साहित्यही आणल्या जाते. मात्र, कोरोनामुळे त्यांचा हा माल घरातच पडून असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहे.

तेल्हारा (जि. अकोला) : कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून केंद्र शासनाने लॉकडाउन जाहीर केला आहे. यामुळे सर्व छोटे-मोठे व्यवसाय ठप्प पडले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शीतपेयांची विक्री करणारे तसेच उसाचा रस विकणारे छोटे व्यावसायिकांना लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे. उन्हाळ्याच्या हंगामाचे त्यांच्याकडून चार ते पाच महिन्यांपूर्वी नियोजन केले जाते. त्यामध्ये साहित्यही आणल्या जाते. मात्र, कोरोनामुळे त्यांचा हा माल घरातच पडून असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहे.

क्लिक करा- हे काय? साखरेच्या गाडीत चक्क गुटखा, तंबाखू, बिडी आणि सिगारेट

अनेक प्रश्‍न येताहेत समोर
उन्हाळ्याची काळजी वाढली की, सर्वच नागरिक उन्हाची काहिली कमी करण्यासाठी उसाचा रस लस्सी, मठ्ठा, कुल्फी, आइस्क्रीम यासह शितपेयाकडे धाव घेतात. पण यावर्षी राज्याला कोरोनाची पार्श्‍वभूमी असल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे गत चार-पाच महिन्यांपासून शितपेय व्यवसायिकांनी केलेले नियोजन कोमलडल्याने सदर व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न पुढे आला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून मे महिन्यापर्यंत हा व्यवसाय जोरात चालतो. यामध्ये एप्रिल व मे दोन महिने अधिक व्यवसाय देणारे असतात. या व्यवसायामध्ये गुंतवणूक कमी असल्याने स्थानिक लोकांसोबत परप्रांतीय लोक देखील मोठ्या प्रमाणात उतरतात. पण लॉकडाउन सुरू झाल्याने या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा- जिल्हाधिकारी म्हणाले नावालाच उघडतात दवाखाने

मोठे आर्थिक संकट आले
दरवर्षी पंचायत समिती समोर शीतपेये विक्रीचे दुकान तथा उसाचा रस विकून बऱ्यापैंकी मजुरी पडते. पण यावर्षी गेल्या दीड महिन्यापासून धंदा बंद असल्याने मोठे आर्थिक संकट आले आहे
-जय भोले ज्यूस सेंटर तेल्हारा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Soft drink sellers in financial crisis