esakal | पंढरीची वारी चुको न दे हरी...या जिल्ह्यातील भाविकांचे पालखीसाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे

बोलून बातमी शोधा

shradhasagar.jpg

येथील श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था व्दारा ‘गुरुमाऊली’ श्री वासुदेव महाराजांच्या पंढरपूर पालखीसाठी शासनाने परवानगी द्यावी अशा आशयाची विनंती करणारे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले आहे.

पंढरीची वारी चुको न दे हरी...या जिल्ह्यातील भाविकांचे पालखीसाठी मुख्यमंत्र्यांकडे साकडे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आकोट (जि. अकोला) : येथील श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्था व्दारा ‘गुरुमाऊली’ श्री वासुदेव महाराजांच्या पंढरपूर पालखीसाठी शासनाने परवानगी द्यावी अशा आशयाची विनंती करणारे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले आहे.

क्लिक करा- बिबट्या आलारे...परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण; असा केला हल्ला

विठूरायाच्या दर्शनाची लागली आस
शेगावकर योगी सम्राट सदगुरु श्री गजानन महाराजांचे पट्टशिष्यश्री संत भास्कर महाराज यांचे नातू श्रद्धेय गुरुमाऊली वासुदेव महाराज पंढरीनाथांचे निस्सिम उपासक होते. त्यांनी आजन्म पंढरीची वारी करून शेवटच्या वारीत आपला देह विठ्ठलचरणी ठेवून विठ्ठलरुप झाले. वारकरी संत परंपरेत गुरुमाऊलींचे महानिर्याण अलौकिक मानले जाते. अशा थोर संतमहात्म्यांची ही पंढरपूर वारी परंपरा श्रद्धेने जोपासत दरवर्षी येथील श्रद्धासागर ते पंढरपूर पालखी सोहळा सुरू आहे. या पायदळ वारीत वारकरी भाविक श्रद्धेने मोठ्या संख्येत सहभागी होतात. आषाढी वारीचे वेध वारकरी भक्तांना लागलेले आहेत. पंढरी वारी व विठूरायाच्या दर्शनाची आस लागली आहे. परंतु, यावर्षी कोरोना सारख्या महामारीचे मोठे संकट ओढवले आहे.


हेही वाचा- अजितदादांच्या वरहस्ताने तोंड दाबून बुक्यांना मार; या जिल्ह्यात राष्ट्रवादीत अंतर्गत धूसफूस

27 जुनला आहे प्रस्थान
लाॕकडाउनच्या परिस्थितीत वारी परंपरा खंडित होवू नये अशी भावना प्रत्येक भक्त व्यक्त करीत आहेत. संत वासुदेव महाराजांची पंढरीची वारी परंपरा सुरू रहावी यावर्षी देखील शासनाने ठरवून दिलेल्या अटी व नियमास अधिन राहून पंढरपूर पालखीला परवानगी द्यावी. अशी विनंती संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेचे अध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले यांनी केली आहे. ‘गुरुमाऊली’ च्या पालखीचे नियोजित प्रस्थान 27 जुनला आहे. श्रद्धासागर ते पंढरपूर असा 650 किमी प्रवास करून संस्थेच्या पंढरपूर येथील धर्मशाळेत पालखीचा मुक्काम असतो. यावर्षी पायदळ वारी ऐवजी वाहनाद्वारे 8-10 वारकऱ्यांसह पंढरपूर पालखीस परवानगी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. निवेदनाच्या प्रति अध्यक्ष विठ्ठल रुख्मिणी संस्थान पंढरपूर, विभागीय आयुक्त, पालक मंत्री अकोला यांना पाठविण्यात आल्या आहेत.