तूर खरेदीची अशीही बनवाबनवी

याेगेश फरपट
मंगळवार, 25 जुलै 2017

आदेश काढले आठ दिवसाचे अन् खरेदीसाठी प्रत्यक्षात लागतील ३६ दिवस

अकाेला - शासनाने माेठा गाजावाजा करीत तूर खरेदीचा अखेर मुहूर्त काढला. मात्र प्रत्यक्षात तूर खरेदी ही ३१ जुलैपर्यंत करावी लागणार असल्याने साडेतीन लाख तूर खरेदी करायला ३६ दिवस लागणार आहेत. त्यामुळे तूर खरेदीचे माेठे आव्हान जिल्हा प्रशासनासमाेर असणार आहे.

आदेश काढले आठ दिवसाचे अन् खरेदीसाठी प्रत्यक्षात लागतील ३६ दिवस

अकाेला - शासनाने माेठा गाजावाजा करीत तूर खरेदीचा अखेर मुहूर्त काढला. मात्र प्रत्यक्षात तूर खरेदी ही ३१ जुलैपर्यंत करावी लागणार असल्याने साडेतीन लाख तूर खरेदी करायला ३६ दिवस लागणार आहेत. त्यामुळे तूर खरेदीचे माेठे आव्हान जिल्हा प्रशासनासमाेर असणार आहे.

सुरवातीपासूनच तूर उत्पादक शेतकऱ्यांची तारांबळ शासनामार्फत उडवल्या जात आहे. आधी तूरीला भाव नव्हता म्हणून शेतकऱ्यांनी तूर विकली नाही. कधी बारदाणा संपल्याचे कारण सांगत तर कधी तूर ठेवायला जागा नसल्याचे कारण पुढे करत शासनाने तूर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरले. विकलेल्या तूरीचा परतावा सुद्धा शेतकऱ्यांना मिळू शकला नाही.

मध्यंतरी तूर खरेदीची आेरड झाल्याने अखेर २१ जुलैराेजी शासनाने आदेश काढून तूर खरेदी करण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यात एकूण ३ लाख ५२ हजार तूर खरेदी अद्याप बाकी आहे. एकूण १४ हजार ५२४ टाेकणची नाेंद बाजारसमितीकडे आहे. ही तूर सध्या बाजारसमितीच्या आवारात पडून आहे. साेमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत ३१ जूलै पर्यंत तूर खरेदी केली जाईल अशी घाेषणा केली. पण प्रत्यक्षात एवढ्या माेठ्या प्रमाणात तूर खरेदी केली जाईल का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

तूर ठेवायची तरी कुठे?

सध्या आधीचीच खरेदी केलेली तूर शासकीय गाेदामात आहे. त्यात आता नव्याने खरेदी केलेली तूर कुठे ठेवतील हा प्रश्न बाजारसमिती प्रशासनाला भेडसावत आहे.

 

ही आहे वास्तविकता

१ पाेतं तूर माेजायला - ५ मिनिट

१ तासात - १२ पाेतं तूरीचे माेजमाप

१ दिवसात - १०८ पाेतं तूरीचे माेजमाप

३० केंद्रावर १ दिवसात - ३२४० क्विंटल तूरीचे माेजमाप

७२ तासात - ७७७६ क्विंटल तूरीचे माेजमाप (एका केंद्रावर)

३० केंद्रावर - २,३३,२८० क्विंटल तूर खरेदी

शिल्लक - १,१६,७२० क्विंटल तूर खरेदी बाकी

तूटलेले शेड अन् खरेदीची घाई

जिल्ह्यातील अनेक बाजारपेठेतील शेट तुटलेले आहेत. त्यामुळे वाहनातून उतरवलेली तूर सुरक्षीत कशी राहिल हा प्रश्न आहे. यात शेतकऱ्यांचीच तारांबळ उडणार आहे.

खासगी गाेडावून कसे मिळतील ?

जिल्ह्यातील विविध संस्थांच्या गाेडावूनमध्ये सध्या शेतकऱ्यांचाच माल ठेवलेला आहे. त्यात अकाेट, बार्शिटाकळीला गाेडावून सुद्धा उपलब्ध नाहीत. त्यामुळे खरेदी केलेली तूर ठेवायची तरी कुठे, हा प्रश्न अधिकाऱ्यासमाेर आहे.

Web Title: akola vidarbha news scam in tur purchasing