दहावीच्या भुगोलाचे गुण किती देणार? दहावीच्या निकालावर पडणार परिणाम, शासनाची भूमिका अस्पष्ट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोना विषाणू संसर्गामुळे दहावीचा भूगोल या विषयाचा पेपर रद्द करण्यात आला होता. इतिहास व भूगोल हे दोन पेपर एकत्र असल्यामुळे जोपर्यंत भूगोल विषयात विद्यार्थ्यांना किती गुण देते दिले जातील हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत दहावीचा निकाला बाबत संभ्रम क्राइम राहणार असल्याने शासनाने याबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.

अकोला : कोरोना विषाणू संसर्गामुळे दहावीचा भूगोल या विषयाचा पेपर रद्द करण्यात आला होता. इतिहास व भूगोल हे दोन पेपर एकत्र असल्यामुळे जोपर्यंत भूगोल विषयात विद्यार्थ्यांना किती गुण देते दिले जातील हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत दहावीचा निकाला बाबत संभ्रम क्राइम राहणार असल्याने शासनाने याबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे.

दहावीचा भूगोल या विषयाचा पेपर कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाने रद्द केला. इतिहास आणि भूगोल हे दोन्ही विषयाचे एकत्र शंभर गूण असतात. त्यापैकी 40 गुणांचा भूगोल हा विषय असतो. या 40 पैकी किती गुण विद्यार्थ्यांना देणार ही भूमिका शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांनी जाहीर केली नाही. त्यामुळे 26 लाख विद्यार्थी व त्यांचे पाल्य चिंतेत आहे.

एकीकडे शासन पेपर तपासणीचे 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करीत आहे. परंतु भूगोल या विषयाचे गुण जाहीर करत नाही, तोपर्यंत पेपर तपासणी व निकाल जाहीर करता येणार नाही. त्यामुळे सरसकट किती गुण देणार हे ही भूमिका शासनाने जाहीर करावी व व 26 लाख विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी आग्रहाची मागणी जिल्हा भाजप अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: akola What is the geography score of 10th? The role of the government is unclear