दारूची "लूट'

file photo
file photo

यवतमाळ : गृहरक्षक दलाच्या जवानाला तपासणी करताना वाहनात दारू आढळली. कारवाईच्या भीतीने दुचाकी सोडून तस्करी करणाऱ्या व्यक्तीने पळ काढला. या संधीचे सोने करीत उपस्थित नागरिकांनी देशी दारूच्या टिल्लूची अक्षरश: लूट केली. काल रविवारी (ता.13) घडलेल्या या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने विविध चर्चांना ऊत आला आहे.

निवडणूक आणि दारू हे जुने समीकरण अद्यापही कायम आहे. या काळात कार्यकर्त्यांची खास बडदास्त ठेवण्यात येते. मात्र, असेही लोक असतात, ज्यांना ना दारू, मटन मिळत नाही. एखादी "लूट' करण्याची संधी मिळाली की, ते सोने करतात, असा काहीसा प्रकार मार्डीवासींनी अनुभवला. विधानसभेसाठी येत्या 21 ऑक्‍टोबरला सार्वत्रिक निवडणूक होऊ घातली आहे. या काळात मतदारसंघात दारू, गांजा, पैसा तस्करी होऊ नये, यासाठी विविध ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक नेमण्यात आलेली आहेत. कर्तव्यावरील कर्मचारी वाहने थांबवून तपासणी करीत आहेत. यात आतापर्यंत गांजा, दारू, पैसा पथकातील कर्मचाऱ्यांची जप्त केला आहे. रविवारी मार्डी येथे कर्तव्यावर असलेल्या गृहरक्षक दलाच्या जवानाने एका दुचाकीची तपासणी केली. तेव्हा त्याला त्यात एक पेटी देशी दारू आढळून आली. दारू तस्करीचे पितळ उघडे पडताच त्याने घटनास्थळावरून पळ काढला. दारू जप्तीची माहिती मिळताच नागरिकांनी रोडवरच देशी दारूचे टिल्लू उचलायला सुरुवात केली. देशी दारूची लूट करण्यासाठी अक्षरश: जत्राच उसळल्याचे चित्र व्हीडीओत चित्रित झाले आहे. देशी दारूच्या लुटीची चर्चा चांगलीच रंगत आहे. 

ही घटना दूर्मीळच

ट्रक पलटी झाल्यानंतर त्यात असणारे तेलाचे पिपे, साखर, बिअरच्या पेट्या नागरिंकानी लांबविल्याच्या घटना आतापर्यंत बघण्यात आल्या. मात्र, एका देशी दारूच्या पेटीवर नागरिकांच्या लुटीसाठी पडलेल्या उड्या ही दूर्मीळ घटना, असे म्हणून चर्चांचा फड रंगत आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com