आशियाई बॉक्‍सिंग स्पर्धेत अल्फियाने लावला सुवर्ण "ठोसा'

फुजैराह : आशियाई ज्युनियर मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी अल्फिया पठाण (मध्यभागी).
फुजैराह : आशियाई ज्युनियर मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी अल्फिया पठाण (मध्यभागी).

नागपूर : नागपूरची आंतरराष्ट्रीय महिला मुष्टियोद्धा अल्फिया पठाणने फुजैराह (संयुक्‍त अरब अमिरात) येथे आयोजित आशियाई ज्युनियर मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. अल्फियाचे हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील तिसरे पदक होय. 18 वर्षीय अल्फियाने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील चमकदार कामगिरी संयुक्‍त अरब अमिरातमध्येही कायम ठेवली. 80 किलो वजनगटात सहभागी अल्फियाने अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या डायना मगावूयेयेव्हाला पराभूत केले. अल्फियाने यापूर्वी 2018 मध्ये सर्बिया येथे झालेल्या नेशन्स चषक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. त्यानंतर गतवर्षी याच स्पर्धेत तिने ब्रॉंझपदकाची कमाई केली होती. सेंट व्हिन्सेंट पलोटी हायस्कूलची विद्यार्थिनी असलेली अल्फिया गणेश पुरोहित व प्रशिक्षक अरुण बुटे आणि फिजिकल ट्रेनर गुड्‌डू ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मानकापूर येथील विभागीय क्रीडासंकुलात सराव करते. नागपूरला नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल राज्य मुष्टियुद्ध संघटनेचे अध्यक्ष जय कवळी, उपाध्यक्ष सज्जाद हुसैन, सचिव राकेश तिवारी, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी, सचिव पोरस कोतवाल व निवडकर्ते अमनप्रीत कौर यांनी तिचे अभिनंदन केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com