प्रिया दत्तच्या उपस्थितीने सर्वच चकित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

अमरावती : अभिनेते संजय दत्त यांच्या भगिनी माजी खासदार प्रिया दत्त यांचे शनिवारी (ता. 27) अचानक अमरावतीत आगमन झाले. अमरावती रेल्वेस्थानकावर प्रिया दत्त आल्याचे कळताच स्थानिक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. स्व. नर्गिस दत्त फाउंडेशनच्या वतीने बहिरम येथील आश्रमशाळेला विविध शालेयोपयोगी साहित्याचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रिया दत्त यांचे शहरात आगमन होणार असल्याची कुठलीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती.

अमरावती : अभिनेते संजय दत्त यांच्या भगिनी माजी खासदार प्रिया दत्त यांचे शनिवारी (ता. 27) अचानक अमरावतीत आगमन झाले. अमरावती रेल्वेस्थानकावर प्रिया दत्त आल्याचे कळताच स्थानिक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी गर्दी केली होती. स्व. नर्गिस दत्त फाउंडेशनच्या वतीने बहिरम येथील आश्रमशाळेला विविध शालेयोपयोगी साहित्याचे वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रिया दत्त यांचे शहरात आगमन होणार असल्याची कुठलीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर, पुरुषोत्तम मुंदडा, भास्कर रिठे, अभिनंदन पेंढारी, खोजयमा खुर्रम, योगेश सोळंके, दिनेश खोडके, देवेंद्र पोहोकार, राजाभाऊ चौधरी, अतुल काळबांडे, फायदर डॅनियल, अभिषेक अलकरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: All surprised by Priya Dutt's presence