esakal | वेळेवर वेतन करा; अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्या; मुख्यमंत्र्यांना निवेदन
sakal

बोलून बातमी शोधा

वेळेवर वेतन करा; अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्या

वेळेवर वेतन करा; अन्यथा आत्मदहनाची परवानगी द्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : पुसद येथील गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याला होत नसल्याने आर्थिक विवंचनेमुळे आत्मदहन करण्याची परवानगी एका कर्मचाऱ्‍याने मागितली आहे. थेट मुख्यमंत्री यांच्याकडे शिक्षकदिनी रविवारी (ता. पाच) आपले सरकार पोर्टलद्वारा ऑनलाइन तक्रार केल्याने शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

विधान परिषदेचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांचे मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित व समाजकल्याण कार्यालय यवतमाळ यांचे अधिनस्त पुसद येथे गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वेतन थकीत राहत आहे. दरमहा सोडाच, पण तीन-तीन महिने वेतन होत नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्‍यांनी अनेक बँकांकडून कर्ज काढले.

हेही वाचा: पोळ्याला घात; बैल धुण्यासाठी गेलेल्या सहा तरुणांचा बुडून मृत्यू

वेळेत वेतन मिळत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांना अतिरिक्त व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याने संस्थेतील लिपिक सुरेश उत्तमराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून आत्मदहन करण्याची परवानगी मागितली आहे. जाधव यांच्या दोन मुली व मुलगा शिक्षण घेत असून फी न भरल्यास शिक्षणापासून वंचित राहावे लागेल तसेच एक मुलगी नागपूर विद्यापीठाअंतर्गत शिकत आहे.

अनेक दिवसांपासून फी भरण्यास महाविद्यालय तगादा लावत आहे. वेतन मिळत नसल्याचे मी मुलामुलींची समजूत काढण्याचे प्रयत्न करून असफल झाल्याने व आर्थिक विवंचनेत असल्याने माझे संतुलन बिघडल्याने मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे दरमहा वेतन करा; अन्यथा आत्मदहन करण्याची परवानगी द्या, असे म्हटले आहे.

हेही वाचा: राज्यात ‘आरटीई’ प्रवेशाच्या ३२ हजार जागा रिक्तच

जाधव यांनी तक्रार केल्याची माहिती मिळाली आहे. वेतन नियमित नसल्याने कर्मचारी बिकट परिस्थितीत आहेत. कर्मचाऱ्‍यांनी एकत्र येऊन सामाजिक व विशेष साहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन दिले आहे. त्यामुळे त्यांचे वेतन दरमहा नियमित होणे आवश्यक आहे.
- श्रीहरी सानप, प्राचार्य, गुलाम नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय, पुसद
loading image
go to top