बुद्धिबळ भिनलंय माझ्या नसानसांत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

नागपूर ः नुकताच बुद्धिबळातील ग्रॅंडमास्टर किताब मिळविणाऱ्या 13 वर्षीय रौनक साधवानीला बुद्धिबळाशिवाय काहीच सूचत नाही. तो रात्रंदिवस बुद्धिबळाचाच विचार करतो. त्यामुळे लवकरात-लवकर विश्‍वनाथन आनंदप्रमाणे विश्‍वविजेतेपद मिळवायचे आहे, असा विचार तो करीत असून, तसे मत त्याने बोलून दाखविले. भारतातील 65 वा आणि विदर्भातील दुसरा ग्रॅंडमास्टर झाल्यानंतर तो नागपुरात दाखल झाला. त्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, अतिशय आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या ब्लिट्‌झ स्पर्धेत भाग घेऊन ग्रॅंडमास्टर किताबाचा आनंद साजरा करायचा आहे.

नागपूर ः नुकताच बुद्धिबळातील ग्रॅंडमास्टर किताब मिळविणाऱ्या 13 वर्षीय रौनक साधवानीला बुद्धिबळाशिवाय काहीच सूचत नाही. तो रात्रंदिवस बुद्धिबळाचाच विचार करतो. त्यामुळे लवकरात-लवकर विश्‍वनाथन आनंदप्रमाणे विश्‍वविजेतेपद मिळवायचे आहे, असा विचार तो करीत असून, तसे मत त्याने बोलून दाखविले. भारतातील 65 वा आणि विदर्भातील दुसरा ग्रॅंडमास्टर झाल्यानंतर तो नागपुरात दाखल झाला. त्यानंतर त्याने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, अतिशय आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या ब्लिट्‌झ स्पर्धेत भाग घेऊन ग्रॅंडमास्टर किताबाचा आनंद साजरा करायचा आहे. त्यानंतर 2600 इलो रेटिंग मिळवून विश्‍वनाथन आनंद, मॅग्नस कार्लसन आणि व्लादमीर क्रॅमनिक यांच्याप्रमाणे विश्‍वविजेतेपद मिळवायचे आहे. तो म्हणाला, मला दिग्गज प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध खेळायला आवडते. त्यामुळे माझी कामगिरी आणखी खुलते. यावेळी रौनकचे प्रशिक्षक आणि विदर्भातील पहिला ग्रॅंडमास्टर अमरावतीचे स्वप्नील धोपाडेही उपस्थित होते. धोपाडे म्हणाले, मी वयाच्या 25 व्या वर्षी ग्रॅंडमास्टर किताब मिळविला. मात्र, रौनकने अवघ्या 13 व्या वर्षी हा किताब मिळवून सर्वांना चकित केले. त्याच्यामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. रौनकप्रमाणेच नॉर्वेचे ग्रॅंडमास्टर मॅग्नस कार्लसन यांनीही वयाच्या 13 व्या वर्षी ग्रॅंडमास्टर किताब मिळविला होता आणि रौनक कार्लसनच्या पावलांवर पाऊल ठेवून पुढे जात आहे. रौनकला आता योग्य प्रशिक्षण आणि प्रायोजकत्व मिळाले, तर लवकरच विश्‍वविजेतेपदाला गवसणी घालू शकतो. यावेळी रौनकचे वडील भारतही उपस्थित होते. ते म्हणाले, त्याची आई व्यवस्थापक म्हणून त्याच्यासोबत असते. मी पूर्णपणे व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याला काही प्रायोजक मिळाले, असले तरी स्वतःच्या खिशातून काही खर्च करावा लागत असल्याने व्यवसायावर लक्ष देणे भाग आहे.

"रौनकला फारसे मित्र नाही. तो कोणत्याही कार्यक्रमाला जात नाही. बुद्धिबळातील यश आणि ग्रॅंडमास्टर किताब मिळविताना त्याने बरेच काही गमाविले आहे. वयाच्या 13 व्या वर्षी तो ग्रॅंडमास्टर झाल्याचा आनंद आहे. मात्र, यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. सहजासहजी काहीही मिळत नाही, ही जाणीव रौनकला आहे.

हीना साधवानी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Always think about chess