Amaravati Scam: गुंतवणुकीच्या नावाने ८१ लाखांनी गंडा; शेअर मार्केटमध्ये अधिक लाभाचे आमिष
Amaravati News: अमरावतीत शेअर मार्केटमध्ये अधिक परतावा मिळेल असे सांगून ८१ लाख ३६ हजार रुपयांनी फसवणूक झाली. गाडगेनगर पोलिसांनी संशयित पीयूष औगडविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अमरावती : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ८१ लाख ३६ हजार रुपयांनी फसवणूक केली. शहरातील गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी रविवारी (ता. पाच) फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.