Amravati Municipal Corporation Standing Committee Chairman Election
esakal
अमरावती : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी येत्या सहा मार्चला निवडणूक घेण्यात येणार आहे. १६ सदस्य असलेल्या या समितीचे सभापतिपद महायुतीतून कोणत्या पक्षाला संधी देण्यात येईल, हे स्पष्ट झालेले नसल्याने राजकीय संशयकल्लोळ वाढला आहे. दरम्यान हे पद भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची मनपा वर्तूळात चर्चा असून राष्ट्रवादीकडे हे पद येणार, असा दावा केला जात आहे.