पत्नीच्या व्यभिचारामुळे केली हत्या

अमरावती ः दुहेरी खूनप्रकरणात अटक गजानन गजभियेला आणताना गुन्हेशाखेचे पथक.
अमरावती ः दुहेरी खूनप्रकरणात अटक गजानन गजभियेला आणताना गुन्हेशाखेचे पथक.

अमरावती : तीन अपत्य असताना पत्नीचे परपुरुषासोबत असलेल्या संबंधाचा राग मनात होता. त्यामुळे ठरवून पत्नी व तिच्या प्रियकराची हत्या केली, अशी कबुली अटकेनंतर गजानन मारोतराव गजभिये (वय 30) याने गुरुवारी (ता. 19) पोलिसांपुढे दिली.
गजाननने प्रियांका व प्रियकर महेश डोंगरे या दोघांचा बुधवारी (ता. 18) सायंकाळी खून केल्यानंतर तो वडगाव जिरे येथून पायी वीरगव्हाणपर्यंत पोहोचला. तेथून एसटीने आर्वी येथे गेला. गुन्हेशाखेचे पोलिस बुधवारी (ता.18) रात्री त्याचे मूळ गाव शेंदोळा (बुद्रूक) व तेथून आर्वीत दाखल झाले. आर्वीतून गुरुवारी (ता. 19) सकाळी गजानन गजभियेला अटक करून अमरावतीत आणण्यात आले. गजानन सहा महिन्यांपूर्वीपासून पत्नी, दोन मुली व मुलासह शहरातील लुंबिनीनगरात राहत होता. त्याच ठिकाणी महेश डोंगरे याच्याही नातेवाइकाचे घर होते. महेश व प्रियांका हे दोघे कॅटरर्सकडे कामाला होते. त्यांच्या भेटीगाठी वाढल्या. महेश वारंवार प्रियांका गजभियेला घेऊन वडगाव जिरे येथील आजीच्या घरी जात होता. पत्नीच्या अशा वागण्यामुळे गजानन एका मुलाला घेऊन आर्वीत निघून गेला. तरीही पत्नीच्या वागणुकीत फरक पडला नाही. महेश नेहमीच भेटण्यासाठी येत असल्याची माहिती गजाननला समजली. त्यामुळे ठरवूनच पत्नी व प्रियकर महेश याला ठार केल्याची कबुली गजाननने दिली, असे पोलिस निरीक्षक प्रमेश आत्राम यांनी सांगितले.
मृतदेह स्वीकारण्यास नकार
खुनानंतर प्रियांका गजभियेच्या आईवडिलांना पोलिसांनी कळविले. परंतु, गुरुवारी (ता. 19) त्यांनी मुलीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. महेशचे शवविच्छेदन दुपारीच झाले. परंतु, प्रियांकाच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया सायंकाळपर्यंत झाली नव्हती, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com