लावणी वर धरला अमेरिकन शिक्षिकेने ठेका....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

बुलढाणा : लावणी म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती. याच लावणीवर अमेरिकन आलेल्या दोन महिला शिक्षकांनी ठेका धरला. बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव येथे संस्कार ज्ञानपीठ या शाळेत टीचर्स फॉर ग्लोबल क्लासरूम या प्रकल्पाअंतर्गत खास अमेरिका येथून अभ्यास दौऱ्याकरिता आलेल्या रॉबनी हैरीसन व मेरिल बेल या समाजिक शास्त्राच्या शिक्षिका अमेरिकन अभ्यासक्रमातील भारतीय इतिहास अभ्यासनासाठी या शाळेत् आल्या होत्या. तेव्हा त्यानी लावणी वर नाचन्याचा मोह आवारता आला नाही. 

या अमेरिकन शिक्षिकाचे कुंकुम लावून फेटे बांधून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर अभिनव प्रकल्प, सांस्कृतिक वारसा, बालमानसशास्त्र, अभ्यासक्रमातील सहविषय अदीचे विस्तृत अध्ययन त्याच्या मार्फ़त करण्यात आले. भारतीय खानपान, वेशभूषा पारंपरिक खेळ या विदेशी पाहुन्याय समोर सादर करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य प्रशांत धर्माधिकारी व शाळेचे शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी उपस्तिथ होते. 

Web Title: American teacher dance on lavani