आमिर खानच्या उपस्थितीत मिशन शक्तीचा शुभारंभ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

चंद्रपूर : मिशन शक्‍तीमुळे तरुणांना संधी मिळाली आहे. खरे म्हणजे माझे अभ्यासात मन लागत नव्हते. क्रीडा क्षेत्राची मला आवड होती. खेळातून सांघिक भूमिका बजावता येते. खेळण्याची जिद्द, हारल्याचे आत्मपरीक्षण करण्याची प्रेरणा क्रीडा प्रकारातून मिळते. शालेय अभ्यासक्रमात विषयानुसार शिक्षणासोबत कौशल्य विकसित करण्यासाठी क्रीडा प्रकाराचा समावेश करण्याची गरज आहे. खेळावर प्रेम करा, देशाचे नावलौकिक वाढवा. एका चेंडूत जग बदलण्याची क्षमता असते, असे प्रतिपादन सिनेअभिनेता आमिर खान यांनी केले.

बल्लारपुरातील वनविकास महामंडळाच्या प्रांगणावर रविवारी (ता. 4) मिशन शक्तीचा शुभारंभ झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार,आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार नाना श्‍यामकुळे, आमदार संजय धोटे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, राज्य क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा विभाग नागपूरचे उपसंचालक सुभाष रेवतकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अतिरिक्त जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, महापौर अंजली घोटेकर,समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा क्रीडाधिकारी अनंता बोबडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक संजय डोर्लीकर यांची उपस्थिती होती.
तरुणाईच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या आमिर खान या कार्यक्रमाला उपस्थित असल्याने मोठ्या संख्येने जिल्हाभरातून नागरिक उपस्थित झाले होते. आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये करीत आमिरने समोरच्या तरुणाईशी संवाद साधला. ते म्हणाले, आपणाशी बोलून मला खूप आनंद झाला. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मी जेव्हा पोचलो तेव्हापासून अगदी आनंदी चेहऱ्याने तरुण माझे सर्वत्र स्वागत करीत आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय सुंदर असे स्टेडियम तयार केले आहे. मला खात्री आहे की या भागातील तरुण मोठ्या संख्येने क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन आपल्या देशाचे नावलौकिक वाढवतील. मी त्यासाठी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो, असेही त्यांनी स्पष्ट स्पष्ट केले.
मराठीत साधला संवाद
बल्लारपूर येथील कार्यक्रमात आमिर खान येणार म्हणून सकाळपासून चाहत्यांनी गर्दी केली होती. आमिर खानचे आगमन होताच त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. अभिनेता आमिर खान यांनी उपस्थितांशी चाहत्यांशी मराठीत संवाद साधला. त्यामुळे अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: amir khan appeal to play sports