Amit Shah : अपत्यप्रेमामुळेच शिवसेना- ‘राष्ट्रवादी’त फूट; पक्ष फोडण्याचे काम आम्ही करीत नाही - अमित शहा

‘‘पक्ष फोडण्याचे काम आम्ही करीत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे दोन तुकडे झाले आहेत.
Amit Shah
Amit Shah Sakal

साकोली (जि.भंडारा) - ‘‘पक्ष फोडण्याचे काम आम्ही करीत नाही. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे दोन तुकडे झाले आहेत. यासाठी आम्हाला जबाबदार धरले जाते. पण, उद्धव ठाकरे यांचे पुत्रप्रेम तर शरद पवार यांच्या कन्याप्रेमामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकडे झाले आहेत,’’ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे रविवारी झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे रविवारी शहा यांची सभा झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करीत शहा यांनी भाषणाला सुरुवात केली.

गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने केलेली कामे सांगतानाच शहा यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. राहुल गांधी, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना लक्ष्य केले. ‘‘‘भारतीय जनता पक्षाला ४०० जागा मिळाल्या तर आरक्षण संपविण्यात येईल, असा चुकीचा आणि खोटा प्रचार राहुल करीत आहेत.

पण, मी येथे स्पष्ट करतो की जोपर्यंत आम्ही सत्तेवर आहोत तोपर्यंत आरक्षणाला धक्काही लागू देणार नाही,’’ असे शहा यांनी सांगितले. ‘‘आम्ही बहुमताचा उपयोग हा तोंडी तलाक आणि ३७० कलम रद्द करण्यासाठी केला आहे. काँग्रेसने अनौरस पुत्राप्रमाणे कलम ३७० चा कलमाचा सांभाळ केला.

काँग्रेसवर १२ लाख कोटींचे गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे तर दुसरीकडे मोदी यांच्यावर पाच पैशाच्या भ्रष्टाचाराचा आरोप नाही. काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात गरिबी दूर करण्याचे आश्वासन दिले आहे. पण, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळापासून हाच नारा दिला जात आहे. याचा अर्थ काँग्रेसमुळेच देशात गरिबांचा विकास झाला नाही,’’ अशी टीका शहा यांनी केला.

मोदींमुळेच रामलल्ला मंदिरात

‘‘येत्या १७ तारखेला रामनवमी आहे. पाच शतकांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रामलल्ला भव्य मंदिरात विराजमान झाले. हे केवळ पंतप्रधान मोदी यांच्यामुळेच घडले. काँग्रेसने राममंदिराचा मुद्दा अनेक वर्षे लटकवून ठेवला. तसेच काशी विश्वनाथ कॉरिडॉर तयार झाला असून सोमनाथ मंदिर सुवर्णमय करणे सुरू आहे, ’’असे शहा म्हणाले.

अमित शहा म्हणाले...

  • गेल्या दहा वर्षांत तेलंगण, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांमधील आणि गडचिरोलीतील नक्षलवाद संपुष्टात आणला

  • गामी पाच वर्षांच्या काळात छत्तीसगडमधील नक्षलवाद नष्ट करू

  • येत्या पाच वर्षांत घराघरांत पाइपलाइनने गॅस पुरवठा

  • नागपूरपर्यंतचा समृद्धी मार्गाचा गोंदियापर्यंत विस्तार

  • विकसित भारताचे स्वप्न २०४७ पर्यंत साकारणार

  • तीन कोटी घरांची निर्मिती

  • २०३६ चे ऑलिंपिक भारतात आयोजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com