अमिताभ इज बॅक 

amitabh
amitabh

नागपूर : ज्यांना पाहताच प्रेक्षक मंत्रमुग्ध होतात असे महानायक अमिताभ यांना व्यंग्यचित्रांचा आनंद घेताना पाहण्याचे भाग्य नागपूरच्या व्यंग्यचित्रकारांना मिळाले. यावेळी महानायकाकडून पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने ही भेट कायम त्यांच्या स्मरणात राहणार आहे. 

"बिग बी' "झुंड' या चित्रपटाच्या शुटिंगसाठी उपराजधानीत आहेत. त्यांच्या नागपूर आगमनाप्रीत्यर्थ सेंट जॉन हायस्कूलमध्ये बच्चन यांच्या जीवनावर आधारित व्यंग्यचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. विदर्भ कार्टुनिस्ट असोशिएशनने या चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रदर्शनाचे उद्‌घाटन अमिताभ बच्चन यांनी केले. यानंतर त्यांनी प्रदर्शनातील चित्रांची उत्सुकतेने पाहणी केली. बच्चन यांच्या आयुष्यावर येथे काढलेली काही व्यंग्यचित्रे पाहून स्वतः बच्चन यांच्या मुखावर हास्य दिसत होते. ही चित्रे काढणाऱ्या चित्रकार, व्यंगचित्रकारांच्या कलेचे त्यांनी कौतूक केले. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनाही ही चित्रे खूप भावली. 

प्रदर्शनासाठी मुख्याध्यापक फादर पत्रस तिरकी, उपमुख्याध्यापक फादर विश्‍वास तोरणे, कला शिक्षक संजय मोरे यांनी प्रयत्न केले. प्रदर्शनाला उमेश चारोळे, गजानन घोंगडे, अमोल ठाकूर, मनोज सिन्हा, सागर कुमार, राहत शुक्‍ला, सतीश उपाध्याय, भटू बागले, सुनील अरमरकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com