झाली मोठी चूक! सुमारे चार हजार शेतकऱ्यांकडून परत घेतली जाणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची रक्कम

दीपक फुलबांधे 
Tuesday, 3 November 2020

केंद्र शासनाने दीड वर्षांपासून पंतप्रधान सन्मान योजना लागू केली आहे. दोन हेक्‍टरपेक्षा कमी शेती असलेले व आयकर न भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे जाहीर करण्यात आले होते.

यवतमाळ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत ज्या शेतकऱ्यांना चुकीने लाभ देण्यात आला. अशा शेतकऱ्यांकडून सन्मानची रक्कम परत घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात चार हजार 646 जणांकडून जमा झालेली रक्कम परत घेतली जाणार आहे.

केंद्र शासनाने दीड वर्षांपासून पंतप्रधान सन्मान योजना लागू केली आहे. दोन हेक्‍टरपेक्षा कमी शेती असलेले व आयकर न भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्याचे जाहीर करण्यात आले होते. नंतर सरसकट सर्व शेतकऱ्यांना परंतु आयकर न भरणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना लागू करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात या योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणावर वाढले. 

सविस्तर वाचा - विवाहितेची कमाल! जिवंत पतीला मृत दाखवून लाटले शासकीय अनुदान अन् केले दुसरे लग्न

जिल्ह्यात चार लाख सात हजार 195 लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली. यातील तीन लाख 47 हजार शेतकऱ्यांची नावे मंजूर करण्यात आली. अनेकांनी नोकरीवर तसे आयकर भरत असतानाही योजनेचा लाभ घेतला. आता मात्र अशा शेतकऱ्यांना निकषाच्या आधारे अपात्र ठरविण्यात आले आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

आतापर्यंत जवळपास पाच हप्ते किसान सन्मान निधीचे वितरित झाले आहेत. यातील अनेक हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले नसल्याचे समोर येत आहेत. जिल्ह्यात अपात्र ठरलेल्या चार हजार 646 शेतकऱ्यांकडून आता वसुली केली जाणार आहे. आतापर्यंत तीन हजार 836 जणांचा लाभ बंद करण्यात आला आहे. उर्वरित 810 चा लाभ बंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्याकडून निधी परत घेण्याची कारवाई केली जात आहे.

करपात्र, खोटी माहिती भरणाऱ्यांकडून वसुली

शेतकरी सन्मान निधीत ज्या करपात्र शेतकऱ्यांना मदत देण्यात आली. तसेच ज्यांनी माहिती लपविली. अशा शेतकऱ्यांकडून आता निधी परत घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मदत घेणाऱ्यांना जमा झालेली रक्कम परत करावी लागणार आहे.

जाणून घ्या - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

अपात्रतेची कारणे

- पीएम किसान अंतर्गत योग्य माहिती न भरणे, आधार कार्ड किंवा बॅंक अकाऊंट न जुळणे.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसतानाही चुकीची माहिती भरून शासनाची दिशाभूल करणे, एकाच व्यक्तीने दोन वेळा योजनेचा लाभ घेणे आदींना अपात्र ठरविल्या जात आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The amount of Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana will be recovered from about four thousand farmers