27-year-old Highly Educated Woman Found Dead at Home
esakal
काही दिवसांपासून तरुणांच्या आत्महत्येचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. अशातच आता अमरावतीत एका 27 वर्षीय उच्चशिक्षित तरुणीनं गळफास घेत आयुष्य संपवलं आहे. राहत्या घरी तिचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरु केला आहे. या तरुणीनं टोकाचं पाऊल का उचललं याचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.