अमरावती करतोय नागपूरचा पाठलाग; चार रुग्णांच्या वाढीने तिसऱ्या शतकाकडे वाटचाल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाहता प्रशासनाची चिंता वाढली आहे. शनिवारी सायंकाळी सहा जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात पॅराडाईज कॉलनी, अचलपूर, रतनजंग, मसानजंग व हनुमाननगर येथील रुग्णाचा समावेश आहे.

अमरावती : शहरात कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. शनिवारी सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असताना रविवारी चार रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा 279 वर पोहोचला आहे. अमरावतीत दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. वाढता आकडा पाहता अमरावती नागपूरचा पाठलाग करीत असल्याचे दिसून येत आहे. 

रविवारी आलेल्या अहवाल चार जण पॉझिटिव्ह आढळून आले. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जयस्तंभ चौकातील आठ वर्षीय बालक, प्रबुद्धनगरातील 40 वर्षीय पुरुष, यशोदानगरातील 19 वर्षीय युवती व विलासनगरातील 57 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाहता प्रशासनाची चिंता वाढली आहे. शनिवारी सायंकाळी सहा जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात पॅराडाईज कॉलनी, अचलपूर, रतनजंग, मसानजंग व हनुमाननगर येथील रुग्णाचा समावेश आहे.

क्लिक करा - का दिला सीबीएसई शाळांना कारवाईचा इशारा, जाणून घ्या

गडचिरोली जिल्ह्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह

आरमोरी तालुक्‍यातील शिवणी बुर्ज या गावात मुंबईहून आलेले पती-पत्नीचे कोरोना अहवाल काल रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले. मुंबई येथे पती सेक्‍युरिटी गार्ड म्हणून काम करीत होते. तीन जूनला ते गावात आल्यानंतर संस्थात्मक विलगीकरणात होते. त्यानंतर त्यांना चार जूनला आरमोरी येथील संस्थात्मक विलगीकरणात हलविण्यात आले. पाच जूनला त्यांचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यांना रात्री जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कातील तीव्र जोखमीच्या लोकांची माहिती घेणे सुरू आहे. प्रशासनाकडून त्यांना ठेवण्यात आलेल्या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 43 झाली आहे. तर सध्या ऍक्‍टिव्ह कोरोना बाधित 13 आहेत. या अगोदर 25 लोकांना कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले. एक जण हैदराबाद येथे मृत पावला आहे. 

नागपुरात आढळले पाच रुग्ण

शुक्रवारी नागपूर शहरात कोरोनाचा ब्लास्ट झाला होता. एकाच दिवशी तब्बल 56 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. यामुळेच प्रशासनाची चिंता वाढली होती. त्यानंतर शनिवारी नऊ तर रविवारी पाच रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे शहरातील वाधितांचा आकडा 697वर पोहोचला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Amravati added four more patients