अमरावती : कृषीपंपांची थकबाकी १३११ कोटींवर

अमरावती जिल्ह्यात केवळ कृषीपंपांची १३११ कोटींची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
agricultural pumps
agricultural pumpsSakal
Summary

अमरावती जिल्ह्यात केवळ कृषीपंपांची १३११ कोटींची थकबाकी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

अमरावती - अमरावती जिल्ह्यात (Amravati District) केवळ कृषीपंपांची (Agriculture Pump) १३११ कोटींची थकबाकी (Arrears) असल्याची धक्कादायक माहिती (Information) पुढे आली आहे. विशेष म्हणजे महावितरणच्या अंजनगावसुर्जी उपविभागात १२ हजार ५९८ ग्राहकांकडे कृषी धोरणानुसार २२४ कोटी ९२ लाख रुपये थकीत आहेत.

कृषीपंपांच्या वीजजोडण्या खंडित करण्यात येत असल्याने सध्या अमरावती जिल्हाच नव्हे तर विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. ही थकबाकी आजची नाही. वारंवार पाठपुरावा करण्यात आल्यावरसुद्धा बिल भरण्यात येत नसल्याने थकबाकी वाढत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. थकबाकीमुळे वीजजोडण्या कापण्यात येत नसून सध्याचे चालू बिल भरण्यात येत नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

agricultural pumps
तरुणीच्या गुप्तांगातून घेतले स्वॅब; टेक्निशियनला सश्रम कारावास

वसूल वीजबिलातून ६६ टक्के रक्कम ही जिल्हा आणि वसूल झालेल्या गावाच्या ऊर्जा विकासासाठी समप्रमाणात खर्च करण्यात येणार आहे. कृषी धोरणाचा लाभ घेत जिल्ह्यातील ३२,९९१ शेतकरी या धोरणात सहभागी झाले असून ५४४५ शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. अंजनगावसुर्जी उपविभागातील आतापर्यंत २ हजार ६५० शेतकऱ्यांनी महावितरणच्या कृषी धोरणात भाग घेतला असून ६९ कृषीग्राहक थकबाकीमुक्त झाले आहेत. थकबाकीमुक्त झालेल्या ग्राहकांनी २६.२२ लाखांचा कृषी धोरणात भरणा केल्याने निर्लेखन व व्याजाव्यतिरिक्त त्यांना २६.२२ लाखांची सूट मिळाली आहे. याव्यतिरिक्त या ग्राहकांनी ७ लाख १७ हजार रुपयांचा चालू वीजबिलाचा भरणा केला आहे.

अशी आहे थकबाकी

- अचलपूर डिव्हीजन : ६७१ कोटी ८३ लाख

- अमरावती ग्रामीण : २८९ कोटी ८ लाख

- अमरावती शहर : १५ कोटी ९९ लाख

- मोर्शी डिव्हीजन : ३३४ कोटी ९ लाख

शासनाच्या वीजधोरणानुसार मार्च २०२२ पर्यंत शेतकऱ्यांना एकूण थकबाकीत ६६ टक्के सूट मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताची ही योजना आहे. या योजनेत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाग घ्यावा.

- दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता, वीजजवितरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com