Amravati Crime : यशोमती ठाकूर यांना धमकी देणारा अटकेत

अमरावती शहरात शिवप्रतिष्ठानच्या वतीने जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संभाजी भिडे यांच्या एका सभेचे आयोजन करण्यात आले होते.
Yashomati Thakur
Yashomati ThakurSakal

अमरावती - काँग्रेस नेत्या व जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री अॕड. यशोमती ठाकूर यांना रिट्वीट करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कैलास गणेश सूर्यवंशी (वय २७, रा. पुसद, जिल्हा यवतमाळ ) याला गाडगे नगर पोलिसांनी मंगळवार तारीख ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी अटक केली. असे गाडगे नगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी सांगितले.

अमरावती शहरात शिवप्रतिष्ठानच्या वतीने जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संभाजी भिडे यांच्या एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये महात्मा गांधी यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर काँग्रेसच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला होता.

सभेच्या दुसऱ्या दिवशी यशोमती ठाकूर यांनी आपली नाराजी व्यक्त करताना संभाजी भिडे संदर्भात वक्तव्य केले होते. त्यांचे वक्तव्य वादग्रस्त होते. असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता. त्यानंतर कैलास सूर्यवंशी नामक व्यक्तीने रिट्विट करीत, यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

त्या विरोधात ठाकूर यांच्या वतीने अमरावती पोलीसात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीनंतर गाडगे नगर पोलीस ठाण्यात कैलास सूर्यवंशी नामक व्यक्ती विरुद्ध ३० जुलैला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आज सूर्यवंशी यास अटक केली. अशी पुष्टी नगरचे पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने यांनी केली.

ज्या कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला त्यामध्ये कैलास सूर्यवंशी यास पोलिसांनी नोटीस बजावली होती.त्यानंतर सूर्यवंशी आज आठ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून अटक करण्यात आली.

- गजानन गुल्हाने. पोलिस निरीक्षक गाडगेनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com