Amravati Case : अयानविरोधात पहिल्यांदाच अल्पवयीन पीडिता आली समोर, पोलिसांनी नोंदवला जबाब, नेमकं काय सांगितलं?

Minor Victim statement record Against Ayan Ahmed : अमरावती प्रकरणातील आरोपी अयानविरोधात पहिल्यांदाच अल्पवयीन पीडिता आली समोर आली असून पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे.
 Ayan Ahmed case latest Update,

Ayan Ahmed case latest Update,

Esakal

Updated on

अमरावती : परतवाडा लैंगिक अत्याचारप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सुरू झाल्यानंतर आता तपासात नवनवीन तथ्ये पुढे येत आहेत. कटातील मुख्य सूत्रधार अयान अहमद व उजेर खान इक्बाल खान या दोघांमध्ये पैशाचा वाद सुरू होता. त्यातून उजेरने अयानच्या मोबाईलमधील डेटा स्वत:कडे घेतला, अशी कबुली सूत्रधार अयानने एसआयटीच्या तपास पथकापुढे दिली. लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत:हून परतवाडा ठाण्यात पोक्सो, सार्वजनिक बदनामी केल्याप्रकरणी अयान व त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास ४२ सदस्यीय एसआयटीकडे वर्ग करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com