Amravati Ashram School Incident : भातकुलीच्या आश्रमशाळेतील ११ वर्षीय विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू; हृदयविकाराचा त्रास असल्याची माहिती

Student Falls Ill at Bhatkuli Ashram School : भातकुली येथील मातोश्री गौराबाई गुढे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता पाचवीतील ११ वर्षीय विद्यार्थिनी प्रिया मावस्कर हिचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
Amravati Ashram School Incident

Amravati Ashram School Incident

esakal

Updated on: 

अमरावती : भातकुली येथील मातोश्री गौराबाई गुढे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील इयत्ता पाचव्या वर्गातील विद्यार्थिनीचा हृदयगती बंद झाल्यामुळे उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

प्रिया गणेश मावस्कर (वय ११, रा. राणीगाव, ता. धारणी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. राणीगाव येथील बरेच आदिवासी विद्यार्थी भातकुली येथील या अनुदानित आश्रमशाळेमध्ये आहेत. प्रिया व तिचा मोठा भाऊ दोघेही येथेच शिकतात. प्रिया ही इयत्ता पाचवीत होती, तिचा मोठा भाऊ नवव्या वर्गात आहे.

गुरुवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास प्रिया हिला पोट व पाय दुखण्याची लक्षणे जाणवू लागली. यामुळे तिला तातडीने आधी भातकुली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. तपासणीमध्ये तिचा पल्स रेट वाढलेला आढळला.

Amravati Ashram School Incident
Navi Mumbai: जनतेच्या पैशांवर 'अमेरिका वारी', नवी मुंबईच्या महापौरांचा दौरा वादाच्या भोवऱ्यात

त्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी व टूडी इको तपासणीनंतर आवश्यक ते निदान करण्यात आले होते, असे रुग्णालयाचे डॉ. रोहन बोबडे यांनी प्रकल्प अधिकारी कार्यालयाला कळविले होते. मात्र, शुक्रवारी (ता. २५) पावणेबाराच्या सुमारास व्हेंटीलेटरवर असताना तिचा मृत्यू झाला.

शवविच्छेदनास नातेवाइकांचा नकार

मृत्यूनंतर शवविच्छेदन करावे अशी विनंती आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व अनुदानित शाळा प्रशासनाने या मुलीच्या पालकांना केली. परंतु, पालकांनी शवविच्छेदन करायचे नसल्याचे लेखी दिल्याने मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला, असे प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितले.

"बालपणापासून प्रियाला हृदयाचा आजार होता. हा आजार अचानक पुढे येतो. अडचण लक्षात आल्यानंतर तिच्यावर चांगल्या खासगी बाल रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ती दगावली. आदिवासी विभागाकडून पालकांना सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे."

- सिद्धार्थ शुक्ला

प्रकल्प अधिकारी, धारणी

Amravati Ashram School Incident
Ashok Chavan Audio Clip : “थांबा जरा, शांत रहा, शिव्या खा”; अशोक चव्हाणांच्या कथित ऑडिओ क्लिपने खळबळ

"अशाप्रकारचे आजार आनुवंशिकतेतून होतात. अचानक लक्षात येत नाही असे डॉक्टरांनी सांगितले. जेवण करेपर्यंत तिची प्रकृती उत्तम होती. नंतर बिघडल्याने आवश्यक ती काळजी घेण्यात आली. परंतु, दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला."

- संगीता शिंदे

मुख्याध्यापक, भातकुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Visapur Ashram School Incident
tribal students hunger strike Maharashtra
Shocking Palghar Ashram School Incident 7 Year Old Student Dies 19 Students Report Fever After Nandurbar
Melghat Ashram School Student Health Row
Marathi News Esakal
www.esakal.com