Young Boy Dies of Heart Attack at Gym
esakal
आपल्या आजीचा वाढदिवस असल्याने मित्रासोबत तेजस आसेगावपूर्णा येथे केक खरेदीसाठी आला. यादरम्यान कधी न गेलेल्या जिमच्या रस्त्याकडे तेजस व मित्रांचे पाय वळले. त्याठिकाणी काळ आपल्यावर झडप घालेल याची तेजसला कल्पनासुद्धा नसेल, की आजचा आपला जिमला भेट देण्याचा दिवस शेवटचा ठरेल. तेजसने जिमला भेट दिली व नियतीने आपला डाव साधला आणि तीच तेजसची जिमची पहिली भेट शेवटची ठरली.