Navneet Rana expulsion demand
esakal
विदर्भ
नवनीत राणांची पक्षातून हकालपट्टी करा! भाजपच्या पराभूत उमेदवारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, विरोधात कसं काम केलं तेही सांगितलं!
Defeated BJP Candidates Write to CM : भाजपच्या काही पराभूत उमेदवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. नवनीत राणा यांच्यामुळे अमरावतीत भाजपला नुकसान झालं, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
गुरुवारी झालेल्या मनपा निवडणुकीत भाजपला केवळ २५ जागांवर विजय मिळाला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ही संख्या फार कमी आहे. त्यामुळे भाजपच्या कामगिरीनंतर आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. अशात आता भाजपच्या काही पराभूत उमेदवारांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. नवनीत राणा यांच्यामुळे अमरावतीत भाजपला नुकसान झालं, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. तसेच नवनीत राणा यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी या पत्रात केली आहे.
