Vijay Wadettiwar : ‘राजकीय लाभ घेण्यासाठी केला बंद अन् म्हणतात शांतता राखा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minister Vijay Wadettiwar

‘राजकीय लाभ घेण्यासाठी केला बंद अन् म्हणतात शांतता राखा’

चंद्रपूर : त्रिपुरा येथील घटनेचे पडसाद महाराष्ट्र आणि देशभर उमटत आहेत. भाजपने राजकीय लाभ घेण्यासाठी आजचा अमरावती बंद आणि मोर्चा आयोजित केला. त्याला हिंसक वळण लागले आहे. आगळीक खपवून न घेता कायदा आपले काम करेल, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

त्रिपुरा येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी अमरावतीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. दुकाने बंद करण्यावरून मारहाण झाली होती. यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. यामुळे भाजपने शनिवारी अमरावती बंदची हाक दिली होती. बंद पुकारल्यानंतर सकाळपासूनच आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.

हेही वाचा: अमरावती बंद : तीन दिवस इंटरनेट सेवा बंद; पोलिस आयुक्तांचा निर्णय

आज सकाळपासूनच तोडफोड व जाळपोळ करण्यात येत आहे. बंद दरम्यानही हिंसा झाली. भाजपने फूट पाडण्यासाठी हा अजेंडा राबविल्याचा आरोप, विजय वडेट्टीवार यांनी केला. अमरावतीत झालेल्या घडामोडींनंतर नागरिकांनी संयम राखावा, असेही ते म्हणाले. काल व आज झालेल्या तोडफोडीच्या आणि जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयातर्फे संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

loading image
go to top