Internet Service Off : तीन दिवस इंटरनेट सेवा बंद; पोलिस आयुक्तांचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Arti singh

अमरावती बंद : तीन दिवस इंटरनेट सेवा बंद; पोलिस आयुक्तांचा निर्णय

अमरावती : अमरावतीत आंदोलनाने चांगलेच हिंसक वळण घेतले आहे. त्रिपुरा घटनेच्या निषेध करताना दुकान बंद करण्यावरून दगडफेक करण्यात आली होती. शनिवारी बंद घोषित केल्यानंतरही चांगलेच वादंग निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून अमरावती शहरात संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. आता तीन दिवस इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

त्रिपुरा येथील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी शुक्रवारी मुस्लीम समाजाच्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केले. त्यानंतर शहराच्या काही भागांत दगडफेक झाली. त्यात व्यावसायिकांचे नुकसान झाले. त्यामुळे या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी भाजप तसेच अन्य संघटनांसह शेकडो नागरिकांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध केला.

हेही वाचा: अमरावती शहरात संचारबंदी आदेश लागू; घराबाहेर पडण्यास मनाई

राजकमल चौकात हजारोंच्या संख्येने पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र जमून निदर्शने केली. शहरातील संवेदनशील परिसर असलेल्या राजकमल चौक, नमुना, जवाहर गेट, जवाहर रोड येथे असलेल्या प्रतिष्ठानात घुसण्याचा प्रयत्न जमावाने केला. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर पाण्याचा मारा केला.

अमरावतीत पोलिसांचा तगडा पोलिस बंदोबस्त लावल्यानंतर आज बंददरम्यान झालेल्या तोडफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयातर्फे संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर काही तोडफोडीच्या घटना घडल्या. त्यानुसार फौजदारी दंड प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ (१), (२), (३) अन्वये पोलिस आयुक्त कार्यालयाकडून संचारबंदी आदेश लागू करण्यात आला.

हेही वाचा: अमरावती बंद : नमुना गल्लीमध्ये निघाले शस्त्र; आता तणावपूर्ण शांतता

पोलिस आयुक्तांनी सुटी केली रद्द

अमरावतीत बंददरम्यान हिंसाचार व जाळपोळ अशा प्रकारच्या घटना घडल्या. यामुळेच रजेवर असलेल्या पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी तातडीने शनिवारी रात्रीपर्यंत शहरात परतण्याचा निर्णय घेतला आहे.

स्पष्ट उल्लेख नाही

हिंसाचार व जाळपोळ अशा घटना घडल्यानंतर आयुक्तालयाच्या हद्दीत अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू केली आहे. तीन दिवस शहरातील इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतल्याची माहिती दिली. मात्र, ही बंदी कधी लागू होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हेही वाचा: ‘चुकीच्या फोटोंवरून आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न’

पाच पोलिस कर्मचाऱ्यांसह काही युवक जखमी

शहरातील राजकमल चौक, अंबापेठ येथे दुचाक्यांसह कारची जाळपोळ करण्यात आली. सौम्य लाठी हल्ल्यासह अश्रूधुरांच्या नालकांड्यासह जमावाला पंगविण्यासाठी प्लॅस्टिक बुलेटचा वापर पोलिसांनी केला. लाठीमार व दगडफेकीत पाच पोलिस कर्मचाऱ्यांसह जमवातील काही युवक जखमी झाले आहेत.

loading image
go to top