Amravati College Student Case : कॉलेज तरुणीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत ठेवले संबंध, फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; १ लाख ३२ हजार हडपले

Youth Accused of Threatening Student With Photos and Videos : अमरावतीत पदवीच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून वैभव नंदू उईकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Amravati College Student Case

Amravati College Student Case

esakal

Updated on

अमरावती : पदवीच्या द्वितीय वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याची सोबत ओळख झाल्यानंतर तिचे लैंगिक शोषण करण्यात आले. शिवाय पीडित युवतीकडून एक लाख ३२ हजार रुपये संशयित युवकाने हडपल्याची घटना शहरात घडली. वैभव नंदू उईके (वय २६), असे युवतीला ब्लॅकमेल करणाऱ्या संशयित युवकाचे नाव असल्याचे शहर कोतवाली पोलिसांनी सांगितले.

संशयित वैभव विरुद्ध अत्याचारासह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जानेवारी २०२६ मध्ये पीडित विद्यार्थिनीला संशयित वैभव याने एका योजनेचा फॉर्म भरून दिला होता. तेव्हापासून दोघांची ओळख व भेटीगाठी वाढल्या.

Amravati College Student Case
Western Vidarbha Crop Damage : पावसाच्या खंडाने पिके संकटात शेतकऱ्यांना भरीव मदतीची ग्वाही; मुदतपूर्व पीक पाहणी पूर्ण करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

पीडित मुलीला भेटीसाठी बोलावल्यावर दुचाकीवर बसवून त्याने शहरातील एका हॉटेलमध्ये नेले. त्या ठिकाणी जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. त्या कृत्याचे संशयित वैभव उईके याने फोटो काढून एक व्हिडिओ सुद्धा तयार केला.

त्याच फोटो व व्हिडिओचा वापर करून संशयित आरोपीने तीन ते चार वेळा पीडितेवर अशाच पद्धतीने अत्याचार केल्याचा आरोप तिने शहर कोतवाली पोलिस ठाण्यात नोंदविलेला तक्रारीत केला आहे. त्याद्वारे संशयित वैभव उईके विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे.

Amravati College Student Case
Asian Games : महाराष्ट्राच्या लेकांनी वेधला रौप्यपदकाचा अचूक नेम; महिलांपाठोपाठ भारताच्या पुरुष नेमबाजी संघाचाही डंका

स्कॉलरशिपचे पैसे युवकाच्या खात्यात पीडित युवतीला स्कॉलरशिपचे एक लाख ३२ हजार रुपये मिळाले होते. संशयित युवकाच्या डिमांडमुळे तिने फोन पे वरून ही संपूर्ण रक्कम युवकाला पाठविली. युवतीने पैसे परत मागितले असता त्याने फक्त दहा हजार परत केले. त्यानंतर पुन्हा पैसे मागितल्यावर त्याने फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. असा आरोप पीडित युवतीने तक्रारीत केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com