Amravati News : रवी राणा यांची चाकूने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार

अंजनगाव सुर्जी येथे सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर आ. रवी राणा यांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडे तक्रारअर्ज दाखल केला.
mla ravi rana
mla ravi rana sakal

अमरावती - अंजनगाव सुर्जी येथे सोमवारी सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर आ. रवी राणा यांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्याकडे तक्रारअर्ज दाखल केला. महेंद्र दिपटेसह ८ ते १० जणांनी आपल्यावर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी तक्रारीतून करण्यात आली.

युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने सोमवारी अंजनगाव सुर्जी येथे दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम आटोपल्यावर शहरातील काही नागरिक आपल्याकडे आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविण्याबाबत त्यांनी आपल्याशी चर्चा केली.

पुतळ्याची जागा बघण्याकरिता आमच्यासोबत चला, असे त्यांनी म्हटले. त्यानुसार आपण कार्यकर्त्यांसोबत पुतळ्याची जागा बघण्याकरिता गेलो. तेथे महेंद्र दिपटे हे दुचाकीने आपल्या वाहनासमोर आले. त्यांच्या मागे ८ ते १० कार्यकर्तेही आले. त्यांनी आपल्याशी वाद घालून बॉनेटवर बुक्क्या मारल्या. महेंद्र दिपटे हे चाकू काढून आपल्या अंगावर आले. आपल्याला शिवीगाळ केली.

आपल्यावर चाकूने हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचवेळी मागे हटल्याने आपले प्राण वाचले. कार्यकर्ते व शिवप्रेमींनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांच्यात झटापट झाली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे महेंद्र दिपटे व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com