esakal | अमरावती : उद्या पडणार उमेदवारी अर्जांचा पाऊस; दिग्गजांची पॅनेलसाठी धडपड
sakal

बोलून बातमी शोधा

उद्या पडणार उमेदवारी अर्जांचा पाऊस; दिग्गजांची पॅनेलसाठी धडपड

उद्या पडणार उमेदवारी अर्जांचा पाऊस; दिग्गजांची पॅनेलसाठी धडपड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक रिंगणात अनेक दिग्गज उतरल्याने ही निवडणूक आता चुरशीची होणार आहे. सोमवारी (ता.6) उमदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून अनेक उमेदवारांकडून अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

31 ऑगस्टपासून उमेदवारी अर्जांची प्रक्रिया सुरू झाली असून 3 सप्टेंबरपर्यंत 118 जणांनी उमेदवारी दाखल केली असून 302 अर्जांची उचल झालेली आहे. याचाच अर्थ सोमवारी सुद्धा 100 च्या आसपास उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

4 ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पॅनेलने सुद्धा मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहे. 21 संचालकपदांसाठी 150 ते 200 उमेदवारांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता असून आता माघारीकडे लक्ष लागणार आहे. अद्याप कोणत्याही पॅनेलकडून उमेदवारांची घोषणा झालेली नसून प्रमुख उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे. येत्या दोन दिवसांत पॅनेलची घोषणा होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: अमरावती : पुसला गावात वाघाचे दर्शन; रोहीची शिकार

दाखल अर्जांची संख्या

दिनांक : उचल : दाखल

31 ऑगस्ट : 90 : 00

1 सप्टेबर : 102 : 08

2 सप्टेबर : 64 : 42

3 सप्टेबर : 46 : 68

एकूण : 302 : 118

बबलू देशमुखांना घेरण्याचे नियोजन

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मावळते अध्यक्ष बबलू देशमुख यांची घेराबंदी करण्यासाठी विरोधक सरसावले आहेत. चांदूरबाजार सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केलेल्या बबलू देशमुख यांच्या विरोधात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अर्ज भरला आहे, तर ओबीसी मतदारसंघातून सुद्धा श्री. देशमुख यांनी अर्ज दाखल केला असून त्यांच्याविरोधात संजय खोडके यांनी स्वतः ची उमेदवारी दाखल केली आहे.

हेही वाचा: विदर्भासाठी गुड न्यूज; अमरावती जिल्हा कोरोनामुक्त

अनेकजण कुंपणावर

सत्ताधारी आणि विरोधी अशा दोनच पॅनेलची सध्या चर्चा होत आहे. दोन्ही पॅनेलकडून उमेदवारी मिळेल या आशेवर अनेकांनी उमेदवारी दाखल करून फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे, मात्र ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष किंवा ऐनवेळी स्थापन होणाऱ्या तिसऱ्या आघाडीकडून संधी मिळते का?, याची चाचपणी अनेकांकडून केली जात आहे.

loading image
go to top