तिवस्या गाई,म्हशीच्या खेळात अंगावर फटाके फोडण्याची जीवघेणी परंपरा

शेकडो वर्षापासूनची परंपरा आजही कायम..
Amravati cows buffaloes running competition
Amravati cows buffaloes running competition

Amravati : अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मकाजी बुवाचे पूजन करत मुख्य बाजारपेठ असलेल्या परिसरात गाई, म्हशींना खेळवण्याची शेकडो वर्षाची परंपरा आहे, हा खेळ पाहण्यासाठी हजारो नागरिकांची मोठी गर्दी होते शहरातीळ काही हौशी लोक हा खेळ भरवतात या दरम्यान गाई,म्हशीं व लोकांच्या गोंगाट्यात एकमेकांच्या अंगावर फटाके फोडण्याची जीवघेनी परंपरा आहे.

चार दिवस साजरा होणारा दिवाळी उत्सवात गवळणीचे नृत्य व गाई,म्हशींना ओवाळून पूजन केले जाते सरत्या वर्षातील महत्वाचा सण दिवाळी असल्याने हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो परंतु तिवसा शहरात शेकडो वर्षापासून अतिशय निर्दयीपणे गाई,म्हशींचा खेळ करत लोकांच्या गोंगाट्यात एकमेकांच्या अंगावर फटाके फोडण्याची जीवघेनी परंपरा आहे.

येथील जुन्या नगरपंचायत कार्यालया समोर असलेल्या वड्याच्या झाडा खाली मकाजी बुवाची मूर्त असून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मूर्तीची पूजा करून याठिकाणी गाई,म्हशीचा धावपळीचा खेळ खेळवल्या जाते, या परंपरेला मागील दोन वर्ष कोरोना निर्बंधामुळे ब्रेक लागला होता,तर यंदा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सूर्य ग्रहण असल्याकारणाने आज तिसऱ्या दिवशी गाई,म्हशींच्या या खेळात शहरातील हौशी तरुण व नागरिक सहभागी झाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com