Amravati Crime News : अडकेतील युवकाने दिली तीन घरफोड्यांची कबुली; अनेक गुन्हे उघड | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Crime News : अडकेतील युवकाने दिली तीन घरफोड्यांची कबुली; अनेक गुन्हे उघड

अमरावती: ग्रामीण भागात वाढत्या चोऱ्या व घरफोड्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक गुन्हे शाखेसह दत्तापूर पोलिसांनी रेकॉर्डवरील सराईत संशयितास अटक केली असता त्याने दत्तापूर हद्दीतील दोन तर नांदगावखंडेश्वर हद्दीतील एक, अशा तीन घटनांची कबुली दिली.

अर्पण ऊर्फ लखन राहुल पाटील (रा. गोजी, सेवाग्राम, जि. वर्धा), असे अटक संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. वाढत्या घरफोड्यांनंतर पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या आदेशाने विशेष तपास पथके गठित करण्यात आली होती. स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणात वर्धा जिल्ह्यातील अर्पण ऊर्फ लखन यास अटक केली.

यापूर्वी त्याच्याविरुद्ध वर्धा आणि नागपूर पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून घरफोडी करण्यासाठी वापरात असलेले विविध शस्त्रे जप्त करण्यात आली. चौकशीअंती त्याच्याकडून घरफोडीचे इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली.

पोलिस निरीक्षक तपन कोल्हे, उपनिरीक्षक विष्णुपंत राठोड, मुलचंद भांबूरकर, पुरुषोत्तम यादव, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, अरुण पवार, सुधीर बावणे, उमेश वाघमारे, सागर कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.