Amravati Crime News : दर्यापुरात अमरावती रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ बंदुकीचा थरार! 3 जखमी

पाठलाग करून कारवर फायर झाल्याने तीन जण जखमी; दर्यापूर शहरात खळबळ
amravati crime update gun firing on car three injured police hospital doctor
amravati crime update gun firing on car three injured police hospital doctorSakal

दर्यापूर - अमरावतीवरून अंजनगावकडे जाणाऱ्या कुटुंबाच्या कारचा पाठलाग करून दर्यापूर येथील रफत पेट्रोल पंपाच्या जवळ मागून येणाऱ्या कारमधून तीन राऊंड फायर करण्यात आले. यात कारमध्ये बसलेल्या युवतीसह अन्य दोन जन जखमी झाले आहेत.

फायर करणारी कार सुसाट वेगाने फरार झाली असून जखमींना तातडीने दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फायर करणाऱ्या कारचा पाठलाग सुरू केला असून लोकेशननुसार विविध पोलीस स्टेशनला या संबंधात माहिती देण्यात आली आहे.

अंजनगाव येथील राहणारे कुटुंब अमरावतीवरून दर्यापूर मार्गे अंजनगाव येथे जाण्याकरिता कार क्रमांक MH 27 DA 8721 या कर ने निघाले असता अमरावती येथील रेवसा फाट्याजवळ त्याची कार पंचर झाल्याचे त्यांना लक्षात आले.

amravati crime update gun firing on car three injured police hospital doctor
Bus Accident : आराम बसची उभ्या असलेल्या माल ट्रकला धडक; 43 जण जखमी, सर्व जखमी नेपाळचे यात्रेकरू

या ठिकाणी आरोपी हे त्यांचा पाठलाग करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले , असे त्यांनी आपल्या बयानात पोलिसांना सांगितले. त्यांनी पंक्चर दुरुस्त केल्यानंतर आपल्या कारचा पाठलाग करत आहे असा संशय आल्याने 112 नंबर वर पोलिसांना संपर्क साधला,

सदर हद्द वलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने वलगाव पोलिसांनी त्यांना ताबडतोब संरक्षण देत खोलापूर पोलीस स्टेशनपर्यंत आणून सोडले. यानंतर खोलापूर पोलीस स्टेशनच्या संरक्षणात सदर कुटुंबाची कार बोराळा फाट्यापर्यंत (खोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीपर्यंत) आली. येथून दर्यापूर पोलीस स्टेशनची हद्द सुरू होते.

amravati crime update gun firing on car three injured police hospital doctor
Nagpur News : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी

मात्र पाठलाग करणाऱ्या कारमध्ये बसलेल्याने दर्यापूर जवळ आल्यानंतर दर्यापूर अमरावती रस्त्यावर असलेल्या रफत पेट्रोल पंपाच्या काही अंतरावर सदर कार असताना बीएमडब्ल्यू या कार मध्ये सवार असणाऱ्यानी त्यांच्याकडील पिस्तूलमधून ताबडतोड तीन राऊंड फायर केले असल्याचे समजले आहे.

सदर कारचा काच फुटून त्या बाजूला बसलेल्या युवतीच्या कानाला गोळी लागली तर मागच्या सीटवर बसलेल्या कुटुंबीय जखमी झाले. फायर झाल्यानंतर सदर कार सुसाट वेगाने पळून गेली. जखमी झालेल्याची नावे तेजस्विनी विश्वजीत राणे वय 26, मुलीची आई अनिता रामकृष्ण सोळंके, मुलीचे वडील रामकृष्ण सोळंके, सहकारी गजानन सुधाकर उर्फडे सर्व राहणार अंजनगाव सुर्जी.

amravati crime update gun firing on car three injured police hospital doctor
NCP in Winter Session: पक्षात फुट असल्याचे आले दिसून; पक्ष कार्यालयातील आव्हाडांची पाटी निघाली

उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संतोष डाबेराव यांनी त्यांचे उपचार केले असून गंभीर जखमी असलेल्या तेजस्विनी राणे या मुलीला तातडीने अमरावती इथे रेफर करण्यात आले आहे. डॉक्टर संतोष डाबेराव यांच्या मते सदर फायर हा देशी कट्ट्यातून झाला असावा असा संशय असल्याचा त्यांनी सांगितले

या संबंधातील तपास दर्यापूरचे ठाणेदार संतोष ताले हे करत असून सदर आरोपीसह कारचा पाठलाग दर्यापूर पोलीस करत असून पुढील सर्व पोलीस स्टेशनला या संबंधातील सूचनदेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले

दर्यापूर शहरात अशाप्रकारे गोळीबार होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने घटनास्थळासह उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांची गर्दी जमली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com