
अमरावतीत भाजप आणि युवा स्वाभिमान पार्टीकडून नवाथे चौकात दहिहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दहिहंडीला मोठ्या प्रमाणावर गोविंदा पथकासह नागरिकांनी गर्दी केली होती. अनेक सेलिब्रिटी कलाकारांनी या दहिहंडीला उपस्थिती लावली होती. भाजप नेत्या नवनीत राणा आणि त्यांचे पती युवा स्वाभीमान पक्षाचे आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीत दहिहंडीचा कार्यक्रम झाला.