esakal | ‘मतदान का केले नाही, तुमच्यामुळे आम्ही सरपंच होऊ शकलो नाही’; चिंचोली शिंगणे गावात वाद पेटला
sakal

बोलून बातमी शोधा

In Amravati district he was beaten up for not voting

रत्नप्रभा भरत ठाकरे यांच्या तक्रारीत मुलांना घरी घेऊन येत असताना पंकज शिंगणे, रामेश्‍वर शिंगणे, चेतन शिंगणे यांनी आम्हाला मतदान का केले नाही, त्यामुळेच आम्ही सरपंच होऊ शकलो नाही, या कारणावरून धमकी व शिवीगाळ केली.

‘मतदान का केले नाही, तुमच्यामुळे आम्ही सरपंच होऊ शकलो नाही’; चिंचोली शिंगणे गावात वाद पेटला

sakal_logo
By
गजेंद्र मंडलिक

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) : तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणुकांनंतर चिंचोली शिंगणे येथे सरपंचपदाची निवडणूक पार पडली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याचे तीव्र पडसाद उमटले. मतदान का केले नाही, या कारणावरून झालेला वाद वाढून मारहाण करण्यात आली. त्यात नऊ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. राजेश ठाकरे असे मारहाणीत जखमी झालेल्या सदस्याचे नाव आहे. जखमीवर अमरावती येथे उपचार सुरू आहे.

रत्नप्रभा भरत ठाकरे यांच्या तक्रारीत मुलांना घरी घेऊन येत असताना पंकज शिंगणे, रामेश्‍वर शिंगणे, चेतन शिंगणे यांनी आम्हाला मतदान का केले नाही, त्यामुळेच आम्ही सरपंच होऊ शकलो नाही, या कारणावरून धमकी व शिवीगाळ केली. तसेच मोठा मुलगा राजेश ठाकरे याला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. ज्यात तो गंभीर जखमी झाला.

अधिक माहितीसाठी - लग्नाच्या महिनाभरानंतर ‘व्हॅलेंटाइन डे’ला आला वाढदिवस; गिफ्टची वाट पाहत असलेल्या पत्नीचा पतीने केला खून

रत्नप्रभा यांच्या तक्रारीवरून नंदू शिंगणे, पंकज शिंगणे, रमेश शिंगणे, चेतन शिंगणे, प्रकाश भीमराव शिंगणे, रमेश नामदेव शिंगणे, मयूर रमेश शिंगणे, गोपाळ उत्तम शिंगणे, अणू गोपाळ शिंगणे यांच्यावर खल्लार पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

मंगरूळचव्हाळात रखवालदारास मारहाण

नांदगावखंडेश्‍वर तालुक्‍याच्या मंगरूळ चव्हाळा ठाण्याच्या हद्दीत मारोतराव नारायण कवळकर (वय ५७, रा. पिंपळगाव निपाणी) समृद्धी महामार्गाच्या स्टोअररूम लोहगाव येथे रखवालदारी करीत होते. रविवारी सकाळी आठच्या सुमारास कवळकर यांना अक्षय गोडेस्वार (वय २२, रा. पिंपळगाव) या युवकाने त्यांना चिडविले व लोखंडी रॉडने हल्ला करून धमकी दिली.

जाणून घ्या - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण: पुणे पोलिस चौकशीसाठी यवतमाळमध्ये दाखल; सत्य समोर येणार?

जखमी वडील गंभीर स्थितीत दिसताच मुलगा तुळशीदास कवळकर यांनी त्यांना नांदगाव येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. मंगरूळ चव्हाळा पोलिस याप्रकरणाचा तपास करीत आहेत.

loading image
go to top