अमरावती : मेळघाटात बालकांसह गर्भवती मातांचे आरोग्य धोक्यात

आयुष्यमान भारत योजना सध्या मेळघाटसह जिल्ह्यात राबविण्यात येते. परंतु या योजनेत काम करणाऱ्या डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे या योजनेचा मेळघाटात सध्या बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे.
pregnant women
pregnant womensakal
Summary

आयुष्यमान भारत योजना सध्या मेळघाटसह जिल्ह्यात राबविण्यात येते. परंतु या योजनेत काम करणाऱ्या डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे या योजनेचा मेळघाटात सध्या बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे.

अचलपूर - जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या आयुष्यमान भारत योजनेचा कारभार सध्या प्रभारीच्या भरवशावर सुरू असल्याने मेळघाटात ही योजना ‘ऑल इज वेल’ नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. मागील तीन महिन्यांपासून नॅशनल हेल्थ मिशन (एनएचएम) विभागात जिल्हा व्यवस्थापक नसल्याने मेळघाटातील सामुदायिक अधिकाऱ्यांकडून गृहभेटी दिल्या जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. परिणामी मेळघाटातील बालकांसह गर्भवती, स्तनदा महिलांचे जीव धोक्यात आले आहेत.

एनएचएम विभागाच्या जिल्हा व्यवस्थापकाची मागील तीन महिन्यांपूर्वी सेवा समाप्त करण्यात आली, तेव्हापासून हे पद रिक्त आहे. सध्या हे पद प्रभारीच्या भरवशावर सुरू आहे. कायमस्वरूपी जिल्हा व्यवस्थापक नसल्याने याचा परिणाम मेळघाटच्या आरोग्यसेवेवर होत आहे. याठिकाणी कार्यरत असलेले सामुदायिक आरोग्य अधिकारी सतत गैहजर राहत असल्याने ही योजना व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसून येत आहे.

आयुष्यमान भारत योजना सध्या मेळघाटसह जिल्ह्यात राबविण्यात येते. परंतु या योजनेत काम करणाऱ्या डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे या योजनेचा मेळघाटात सध्या बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे. या योजनेत नियुक्त करण्यात आलेल्या सामुदायिक अधिकाऱ्यांना आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या जॉबचार्टनुसार कार्यक्षेत्रातील गावात प्रत्येक दिवशी गृहभेट करावी लागते. मात्र बहुतेक सामुदायिक अधिकारी गृहभेटीला तिलांजली देत आहे. त्यामुळे की काय मेळघाटातील घराघरात कोणकोणते आजाराचे रुग्ण आहे, याची माहिती या अधिकाऱ्यांना नसते. याचा प्रत्येय अनेकदा पाहायला मिळाला.

काही महिन्यांपूर्वी गौलखेडाबाजार येथील सामुदायिक आरोग्य अधिकारी यांनी गृहभेटी न दिल्याने एका नऊ वर्षीय सिकलसेल मुलीला जीव गमवावा लागला होता, त्यानंतर याप्रकरणाची चौकशीसुद्धा केली, त्यामध्ये सामुदायिक आरोग्य अधिकारी दोषी आढळून आले होते. विशेष म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून कारवाईसुद्धा करण्यात आली. अशी अनेक प्रकरणे मेळघाटात आढळून येतात. काही प्रकरणे दडपली जातात. यामुळे मात्र मेळघाटातील बालकांचे तथा गर्भवती मातांचे जीव धोक्यात आले आहेत, यासाठी तत्काळ एनएचएम विभागात जिल्हा व्यवस्थापकाची नियुक्ती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com