अमरावती : पूर्वप्रेयसीचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vidarbha

अमरावती : पूर्वप्रेयसीचे फोटो सोशल मीडियावरून व्हायरल

अमरावती : बालपणीच्या मैत्रीनंतर दोघांचे प्रेमप्रकरण सुरू झाले. परंतु काही दिवसांत युवतीचा विवाह झाल्याने तिने पूर्वीच्या प्रियकरास टाळले. त्यामुळे चिडलेल्या प्रियकराने पूर्वप्रेयसीचा फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केला.

असलम सलाम शेख (वय ४३) याच्याविरुद्ध राजापेठ पोलिसांनी विनयभंग व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. शाळेत शिकत असताना असलमची एका युवतीसोबत ओळख झाली होती. प्रेमप्रकरणानंतर त्यांच्या भेटीगाठी झाल्या. असलम याने पीडितेचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये काढून ठेवले होते. परंतु युवतीचा काही दिवसांनी विवाह झाल्याने तिने असलम सोबतचे संबंध तोडले. त्यामुळे त्याने पूर्वप्रेयसीला जीवे मारण्याची धमकी दिली. दोघांचे फोटो पीडितेच्या पतीच्या मोबाईलवर पाठविले.

हेही वाचा: 'काशी-मथुरा बाकी है!' मथुरेतील मशिदीत बसवणार श्रीकृष्णाची मुर्ती; हिंदू महासभेची धमकी

पीडितेच्या पतीला व मुलाला असलमने जीवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज पाठविला. पीडितेचे फेसबुक अकाउंट असलम याने हॅकसुद्धा केले. खासगी फोटो सोशल मीडियावर पाठवून बदनामी केली, असा आरोप पीडितेने राजापेठ ठाण्यात दाखल तक्रारीत केला. प्रकरणी पोलिसांनी संशयित असलम सलाम शेख विरुद्ध गुन्हा दाखल केला. अद्याप त्याला अटक झाली नाही.

loading image
go to top