esakal | अमरावती : दोघा भावांच्या भांडणात पित्याचा खून
sakal

बोलून बातमी शोधा

 खून

अमरावती : दोघा भावांच्या भांडणात पित्याचा खून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : दोघा भावांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पित्याला जीव गमवावा लागला. मोठ्या मुलाने नाकावर जबरदस्त मारलेल्या ठोश्यामुळे गंभीर जखमी झालेल्या पित्याचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

वलगाव पोलिस ठाण्यांतर्गत भातकुली तालुक्यातील आबीदपूर येथे ही घटना सोमवारी (ता. १३) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. महादेव तायडे (वय ७०), असे मृत पित्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर तायडे रात्री मद्यप्राशन करून आल्याने त्याचे लहान भाऊ दीपक तायडे यासोबत भांडण झाले. मद्यप्राशन करून आलेल्या ज्ञानेश्वरला त्याने घराबाहेर जाण्यास सांगितले. यावरून त्यांच्यातील वाद विकोपास गेला.

हेही वाचा: चोरी करायला गेले अन् हसं करुन आले; पाहा भन्नाट व्हिडीओ

उभयतांमध्ये जोरदार हाणामारी सुरू होती. दरम्यान वडील महादेव तायडे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता ज्ञानेश्वरने त्यांच्या नाकावर जोरदार ठोसा मारल्याने ते जखमी होऊन खाली पडले. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वलगाव पोलिसांनी याप्रकरणी लहान मुलगा दीपक तायडे याच्या फिर्यादीवरून खुनाच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले असून ज्ञानेश्वर तायडे यास अटक केली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव तपास करीत आहेत.

loading image
go to top