esakal | उपायुक्तांच्या नियुक्तीवरून अमरावती महापालिकेत नाराजीचे फटाके; सत्ताधारी पक्ष नाराज 
sakal

बोलून बातमी शोधा

Amravati Mayor Disappointed by posting of deputy commissioner

विजय खोराटे यांच्या स्थानांतरानंतर महापालिकेतील उपायुक्त (सामान्य) हे पद एप्रिल महिन्यापासून रिक्त होते. शासनाकडून अधिकारी नियुक्त होण्याची प्रतीक्षा असताना अद्यापही शासनाने नियुक्ती केली नाही.

उपायुक्तांच्या नियुक्तीवरून अमरावती महापालिकेत नाराजीचे फटाके; सत्ताधारी पक्ष नाराज 

sakal_logo
By
कृष्णा लोखंडे

अमरावती ः महापालिकेतील रिक्त असलेल्या उपायुक्तपदी (सामान्य) सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे या पदाचा अतिरिक्त प्रभार सोपविण्यात आला असून झोन क्रमांक तीनच्या सहायक पदाचा कारभार अभियंता नंदकिशोर तिखिले यांना देण्यात आला आहे. डेंगरे यांच्या नियुक्तीवरून सत्ताधारी पक्षाने विशेषतः महापौरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा मुद्दा आगामी आमसभेत गाजण्याची व दिवाळीनंतर महापालिकेत फटाके फुटण्याची शक्‍यता आहे.

विजय खोराटे यांच्या स्थानांतरानंतर महापालिकेतील उपायुक्त (सामान्य) हे पद एप्रिल महिन्यापासून रिक्त होते. शासनाकडून अधिकारी नियुक्त होण्याची प्रतीक्षा असताना अद्यापही शासनाने नियुक्ती केली नाही. दरम्यान पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांची या पदावर नियुक्ती करण्याची शिफारस महापौर चेतन गावंडे यांनी केली होती. या मुद्यावर सत्ताधारी व आयुक्त यांच्यात पत्रयुद्ध चांगलेच गाजले.

क्लिक करा - राष्ट्रवादीने चोवीस तासांत बदलला निर्णय, दुसरीकडे शिवसेना रूसली

आयुक्त प्रशांत रोडे यांनी बुधवारी (ता.11) सायंकाळी उशिरा सिस्टीम मॅनेजर अमित डेंगरे यांची उपायुक्त (सामान्य) या पदावर नियुक्तीचे आदेश काढले. सोबतच झोन क्र. तीनच्या सहायक आयुक्तपदावर झोन अभियंता नंदकिशोर तिखिले यांच्याही नियुक्तीचे आदेश निर्गमित केले. दोन्ही नियुक्‍त्या तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे व हा अतिरिक्त कार्यभार असल्याचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केले आहे. 

अमित डेंगरे यांच्या नियुक्तीला सत्ताधारी बाकाहून तीव्र विरोध आहे. महापौर चेतन गावंडे यांनी या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. हा मुद्दा कायदेशीर बाबी तपासून आमसभेत मांडण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

आता तांत्रिक मुद्दा नाही का?

महेश देशमुख यांच्या नियुक्तीस तांत्रिक अवरोध असल्याचे कारण आयुक्तांनी दिले आहे. त्यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव विखंडणाकरिता शासनाकडे पाठविला. अमित डेंगरे सिस्टीम मॅनेजर असून हे पदही तांत्रिक स्वरूपाचे आहे. त्यांची नियुक्ती करताना आता आयुक्तांना तांत्रिक अवरोध कसा गेला नाही? असा सवाल महापौर चेतन गावंडे यांनी उपस्थित केला आहे. कायदेशीर बाबी तपासण्यात येतील व आमसभेत यावर चर्चा करण्यात येऊन निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image