

Amravati Morshi Mutton Party Case
Esakal
मोर्शी नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर झालेल्या मटण पार्टीचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करणाऱ्या रमाकांत गावंडे यांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने यांचे पती आणि नगरसेवक रवींद्र गुल्हाने यांच्याविरोधात मोर्शी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या सांगण्यावरूनच मारहाण करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.