स्वच्छता कंत्राटदारांना बसणार लगाम; आता नगरसेवकांच्या शिफारसीनंतरच मिळणार देयके, 'या' महानगरपालिकेचा मोठा निर्णय...

Amravati Municipal Corporation New Rule for Cleaning Contractors : नगरसेवकांच्या शिफारसीशिवाय स्वच्छता कंत्राटदारांना आता देयके अदा करण्यात येणार नाहीत. या सदस्यांच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली आहे.
Amravati Municipal Corporation New Rule for Cleaning Contractors

Amravati Municipal Corporation New Rule for Cleaning Contractors

ESAKAL

Updated on

अमरावती : महापालिकेतील महापौर वगळता उपमहापौरांसह स्थायी समिती सभापती, सभागृह नेता व विरोधी पक्षनेता यांना वाहन भत्त्यापोटी प्रतिमाह पन्नास हजार रुपये देण्यास स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली आहे. यासोबतच गटनेते, विषय समिती सभापती व अधिकाऱ्यांना ३५ हजार रुपये प्रति महिना भत्ता देण्यासही मंजुरी देण्यात आली. नगरसेवकांच्या शिफारसीशिवाय स्वच्छता कंत्राटदारांना आता देयके अदा करण्यात येणार नाहीत. या सदस्यांच्या प्रस्तावासही मंजुरी देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com