Amravati Election Result 2026
esakal
अमरावती, ता. १६ : महापालिका निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत युवा स्वाभिमानने पंधरा जागा जिंकून विक्रम करण्यासोबतच भाजपला सत्तेसाठी आपल्या पिचवर खेळण्यासाठी येण्यास भाग पाडले आहे. भाजपला तब्बल वीस जागांचे नुकसान झाले असून पंचवीस जागांवर समाधान मानण्याची वेळ आली. काँग्रेसने पंधरा जागा जिंकत इभ्रत वाचविली असून राष्ट्रवादीचा मात्र उदय झाला. या पक्षाने अकरा जागा जिंकल्या. एमआयएमने यावेळीही जोरदार प्रदर्शन करीत बारा जागा जिंकल्या.