Amravati Municipal Election 2026: अमरावतीत मित्रपक्षांनीच केली भाजपची कोंडी! राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं आव्हान; युवा स्वाभिमानाची प्रतिष्ठाही पणाला

Amravati Municipal Corporation Election 2026 : गेल्या पंचवार्षिकमध्ये ४५ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपसमोर यंदा सत्ता हस्तगत करण्याचे आव्हान आहे.
Amravati Municipal Corporation Election 2026

Amravati Municipal Corporation Election 2026

esakal

Updated on

अमरावती मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) व बडनेरा मतदारसंघात युवा स्वाभिमानने भाजपची कोंडी केली आहे. त्यामुळे गेल्या पंचवार्षिकमध्ये ४५ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपसमोर यंदा सत्ता हस्तगत करण्याचे आव्हान आहे. काँग्रेसने मित्रपक्षांसोबत तडजोडीचे राजकारण करीत रणांगणात उडी घेत सत्ता मिळवण्याचा दावा केला आहे.

महापालिकेच्या रणांगणात भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेस, अशी तिरंगी लढत रंगण्याचे चिन्ह आहे. महायुती व महाविकास आघाडीची शकले झाली असून सारेच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने मतदारसुद्धा संभ्रमात आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत साऱ्याच पक्षांना मनातून युती किंवा आघाडी नकोच होती. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत मित्रपक्षांना जागावाटपात गुंतवून ठेवण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com