Amravati Municipal Election 2026
esakal
Amravati Municipal Election 2026 witnesses intense political battle : राज्यात २९ मनपाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यात अमरावती मनपाचा देखील समावेश आहे. अमरावती मनपाची शेवटची निवडणूक २०१७ मध्ये झाली होती. तर २०२२ मध्ये या मनपाचा कार्यकाळ संपला होता. तेव्हापासून मनपाचा कारभार हा प्रशासकांद्वारे चालवला जात होता. मात्र, आता पुन्हा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यामुळे अमरावतीत राजकीय वातावरण देखील तापलं आहे.